रा. त्रिलोकेकर यांनी ' नलदमयंती ' हे नाटक श्रीमहाभारत व भट्ट प्रेमानंदकृत नलोपाख्यान यांच्या आधारें रचले असून त्यांत त्यांनी आर्या, साक्या, दिंड्या व निरनिराळ्या वृत्तांतील श्लोक यांचा भरणा जास्त घातला आहे. तथापि त्यांत कांहीं कांहीं जुन्या चालीवरचीही पयें
घातली असून ‘पतिविण मजला सौख्य गमेना । काय करूं मजला कांहीं सुचेना।' इ. ' मजला मातृ गृहीं जाया,दयाळा सांगू नका' इ. ही दमयंतीच्या तोंडची व याखेरीज आणखीही दुसरी कांहीं पयें सरस साधली आहेत.
रा. त्रिलोकेकर यांची नाटके करणा-या 'हिंदुसन्मागबोधक मंडळी' त रा. बाप खरे हे सूत्रधार, कलि,ऋषि वगैरेंची कामें उत्कृष्ट करीत असून त्यांचे गाणेही मोहक होतें.रा. धोंडोपंत जोशी यांनीं दमयंतीचे काम केले होते. याखेरीज रा.आण्णा मंत्री, कोठारे वगैरे इसम दुसरी
कामें करीत असत. ही मंडळी नाटकाचा धंदा करणारी नव्हती. आपापले उद्योग संभाळून मौजेखातर नाटकें करीत असत त्यामुळे नाटकें चांगलीं होऊन खेळास पांच सहाशें रुपयेपर्यंत उत्पन्न होत असे. रा. त्रिलोकेकर यांनीं 'संगीत हरिश्चंद्र' नाटक केलें आहे ह्मणून जें वर लिहिलें आहे
त्याची पहिली आवृत्ति इ. स. १८८० मध्यें निघाली असून ती रा. किर्लोस्करांच्या प्रयोगाच्या पूर्वीच छापलेली आहे. या नाटकांत हरिश्चंद्राचा छल चालला असतां
पान:मराठी रंगभुमी.djvu/106
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९०
मराठी रंगभूमि.