पान:मराठी रंगभुमी.djvu/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९२
मराठी रंगभूमि.


णाने संस्कृत भाषेतील काव्यनाटकादि ग्रंथांचा यांना रसास्वाद घेतां आला, व पूर्ववयांत मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊन त्यांनी शेवटी ही संगीत नाटकाची कला उदयास आणिली. यांची जन्मभूमि बेळगांव जिल्ह्यांत असून पूर्ववयापैकी बराच काल त्यांनी तेथें घालविला होता. तिकडे कृष्णलीलात्मक संगीत पारिजातादि कानडी भाषेत होत असलेले प्रयोग त्यांनी पुष्कळ पाहिले होते; व पुढे रोव्हिन्यू कमिशनरच्या ऑफिसांत नोकरी धरल्यावर पुणे, मुंबई येथे संस्कृत व पारशी नाटकांचे प्रयोगही त्यांनी कित्येक पाहिले; व या प्रयोगांवरून मराठी रंगभूमीलाही संगीताने सजवावें असें त्यांच्या मनाने घेतलें, व इ. स. १८८० सालीं " कमिशनरसाहेबांचे ऑफिस बरसातीकरितां पुण्यास आले असतां त्या चातुर्मास्यांत रंगदेवतेची उपासना करून पुण्यजनमनोरंजन वर्षातून एकदां करावें हा त्यांनी संकल्प कला." काव्यरचनेचा यांना पहिल्यापासून नाद होताच. शिवाय 'शांकरदिग्जय' नांवाचें एक गद्य नाटक रचून त्यांनी नाट्यकलेविषयींची आपली अभिरुचि पूर्वीच व्यक्त केली होती. तेव्हां अशा रसिक मनुष्याची संगीताविषयींची ही कृति लोकादरास लवकरच पात्र झाली हे सांगावयास नको. यांनी पहिल्या प्रथम महाकवि कालिदासकृत संस्कृत शाकुंतल नाटकाचे गद्यपद्यात्मक भाषांतर करून या वेळपर्यंत लोकांस विशेष माहित नसलेला रागबद्ध संगीत नाट-