प्रयोगाचें आद्यप्रवर्तकत्व दिलें. ” याच प्रस्तावनेंत'इंदुग्रकाश' पत्राच्या ता.११ आॅगट १८७९ च्या अंकांतील पुढील उतारा दिला आहे:-" आमच्या अलीकडच्या मंडळीच्या नाटकांत आणि दमयती नाटकांत एक फरक दृष्टीस पडतो तो हा कीं, नाटकवाल्या मंडळींच्या नाटकांतून कविता म्हणावयाच्या त्या सूत्रधारबुवांनीं ह्मणून पात्रांकडून त्याचा अर्थ मात्र बोलून दाखविण्यांत येतो. परंतु ह्या नाटकांत तसा प्रकार नाहीं. प्रत्येक पात्राच्या तोंडीं ज्या कविता घातल्या आहेत त्या ज्याच्या त्यानेंच ह्मटल्या पाहिजेत. तेव्हां त्या दृष्टीनें पाहतां आमच्या नाटकपद्धतींत ग्रंथकर्त्यांनीं ही एक सुधारणा केली असें ह्मणण्यास प्रत्यवाय दिसत नाहीं; तरी अलीकडील नाटकी तऱ्हेची सुधारणा होऊन उत्तरोत्तर नाट्यकलेची वास्तविक योग्यता समजावून देण्यास हा ग्रंथ जास्त अंशीं साधनीभूत होईल.” रा.त्रिलोकेकर यांच्या पद्यांत किर्लोस्करांच्या बहुतेक पद्यांच्या चाली सांपडतात,यावरून त्यांच्या बुद्धिकौशल्याचें व परिश्रमाचें अनुमान होणार असून आद्यकर्तृत्वाबद्दल रा.सॉकर बापूजींची तारीफ केल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं,अशा अर्थाचें केरळकोकिळकारांनींही पुस्तकपरीक्षण या सदराखालीं मार्च १८९५ च्या अंकांत उद्रार काढिले आहेत. यावरून रा. त्रिलोकेकर हेच संगीत नाट्काचे मूळ उत्पादक असें म्हणावयास चिंता नाहीं.
पान:मराठी रंगभुमी.djvu/105
Jump to navigation
Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८९
भाग २ रा.
