पान:मराठी रंगभुमी.djvu/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८६
मराठी रंगभूमि.


यांत असून कुंटिण, दलाल, वैगरे पात्रेही यांत गोविलीं आहेत. नाटक साधारण बरें आहे, पण त्यांतील विषयं जुना असल्यामुळे व वरील दोन नाटकांसारखे त्याला कोठेंही स्थानिक महात्म्य नसल्यामुळे त्याच्या प्रयोगानें विशेष चळवळ उडाली नाहीं व त्याचे प्रयोगही फार झाले नाहींत.
 रा. सा. गोपाळ अनंत भट यांनीं केलेलें 'पद्मावती' नांवाचें एक सद्यःस्थितिदर्शक नाटक ' पुणेंकर हिंदुस्त्री नाटकमंडळी ' करीत असते. यांत बालविवाह, विधवाविवाह, विश्वविद्यालयास सरकारी मदत, व्यापारप्रतिबंधक कायदा, खालसा झालेल्या जहागिरी,शेतक-यांस ऋणमुक्त करण्याचा कायदा, गोरक्षणास मदत, जगांतील निरानराळ्या धर्माचीं तत्वें, देवस्थानें, उच्चप्रतीचे भिक्षुक वगैरे विषयांवर विचार प्रगट केले असून यांत पात्रांचे स्वभाव बनवण्याकडे विशेष लक्ष पुरावलें नाहीं, त्यामुळे नाटकाचा परिणाम लोकांच्या मनावर होत नाहीं.
 यांखेरीज रा.कानिटकरकृत 'शीघ्रसुधारणादुष्परिणाम' नांवाचें एक नाटक ८।९ वर्षांपूर्वी ' स्वदेशहितचिंतक नाटकमंडळी ' नें पुण्यास केलें होतें. पण एक दोन प्रयोग झाल्यावर त्याचें पुढे कोठेंही नांव ऐकू आलें नाहीं.