रा. त्रिलोकेकर व संगीत नाटकांची सुरुवात-किर्लोस्कर नाटकमंडळी-डोंगरे यांची कंपनी-वाईकर कंपनी-नाट्यानंद कंपनी-त्या वेळूच्या आणखी कांही संगीत कंपन्या-पाटणकर संगीत मंडळी-किर्लोस्कर कंपनींत फेरफार.-अलीकडील संगीत कंपन्या-अलीकडची किर्लोस्कर मंडळी-इतर नाटकं व पात्रें.
मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाचा प्रयोग करण्याची ट्रॅम पहिल्यानें रा. सोकर बापूजी त्रिलोकेकर यांनीं काढिली. यापूर्वी ‘ विष्णुदासाचीं जी नाटकें होत तीं एक तहेनें संगीतच होत '* असें म्हटलें तरी चालेल. पण त्या संगीताहून रा. त्रिलोकेकर यांनों काढलेलें संगीत अगदीं निराळे आहे. पूर्वी सूत्रधारालाच खेळ संपेपर्यंत सर्व गाणें गावें लागत असे; पण रा. त्रिलोकेकर यांनीं सूत्रधाराला थोडें गाणें ठेवून बाकीचें सर्व गाणें पात्रांच्या तोंडी घातलें. या पद्धतीनें पूर्वी एकाच व्यक्तीचें एकाच आवाजीचें गाणें जें शेवटपर्यंत ऐकावयास लागे त्या ठिकाणीं निरनिराळ्या व्यक्तींचीं निरनिराळ्या आवाजीचीं गाणीं ऐकावयास मिळू लागल्यामुळे एक प्रकारचें वैचित्र्य उत्पन्न होऊन चांगली करमणूक होऊं लागली.
* विष्णुदास हें रा. भावे यांचें नांव. हें नांव आपल्या कवितेच्या अखेरीस ते घालीत असत. भावे यांची कविता वापरून त्यांच्याच सांप्रदायाप्रमाणें पुढें जीं नाटकें झालीं त्यांनाही विष्णुदासाची नाटकें ह्मणण्याचा प्रघात आहे.