पान:मराठी रंगभुमी.djvu/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८५
भाग १ ला.


'आर्यभूषण नाटकगृहां' त केले. या मंडळींत तेथील सासून हॉस्पिटलमध्यें इंग्रजी वैद्यक शिकणा-या विद्याथ्यपैिकीं बरेच विद्यार्थी असून नाटकासंबंधानें त्यांना इतर सुशिक्षित मंडळीनें चांगलें शिक्षण दिलें होतें; व नाटकांतील विषय ताजा, त्यावेळीं अत्यंत चळवळीचा व स्थानिक व्यक्तिविषयक मतांचा असल्यामुळे या नाटकाची लोकांत चांगली रीझ पडली. या नाटकांत गणपतराव व सरस्वती हीं नायक व नायिका असून त्यांच्या भूमिका अनुक्रमें रा. शिवराम दीक्षित व लखु पाटणकर यांनीं केल्या असून त्या चांगल्या वठल्याबद्दल केसरीकारांनीही आपल्या पत्रांत शिफारस केली आहे. कांहीं विघ्रसंतोषी मंडळीनें यांच्या नाटकास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता, पण तो सफल झाला नाहीं. पुण्यास खेळ केल्यावर ही मंडळी मुंबई, नगर येथेंही गेली होती.
 ' कन्याविक्रयदुष्परिणाम ' हें एक सामाजिक विषयावरीलच नाटक असून त्याचे प्रयोग इ. स. १८९५ च्या सुमारास मुंबई येथें ' विद्वज्जनाश्रित नाट्यामोदप्रसारक समाजा ' नें केले होते. यांत हरभट नांवाच्या ब्राह्मणानें आपल्या गंगू नांवाच्या कन्येचा विक्रय करून दामोदरपंत नांव्याच्या एका वृद्ध इसमाशीं विवूह लावून दिला. पुढें दामोदरपंत मरण पावल्यावर गंगू ही कुमार्गास प्रवृत्त झाली व नंतर तिनें बालहत्याही केली असा कथाभाग