पान:मराठी रंगभुमी.djvu/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८४
मराठी रंगभूमि.


उडून टोलेजंग सभा भरल्या होत्या, व त्यांच्या द्वारे सरकाराकडे आपापले मत कळविण्यांत आले; व अखेर सरकाराने बहुजनमतास मान न देतां कायदा पास करून टाकला, ही गोष्ट या नाटकाचे सविधानकास आधारभत धरून या कायद्याचा दुष्परिणाम अखेर या नाटकांत दाखविला आहे. नव्या पक्षांतील कै. न्या. रानडे, डा.भांडारकर, कै. रा. आगरकर, मि. मलबारी शेट वगैरे गृहस्थांची व जन्या पक्षांतलि रा. टिळक वगैरे मंडळींची मतें ज्या प्रकारची होती ती या नाटकांतील कांहीं पात्रांच्या तोंडांत घातली असून कोरडा उपदेश करून सुधारणेची तडफ करणाऱ्या सुधारकावर प्रत्यक्ष प्रसंग येऊन बेतला ह्मणजे तो कोणत्या कसास उतरतो, शेण लावून कोटीच्या बैलांत शिरल्याप्रमाणे सुधारकी बाण्याची नुसती घमेंड मारून झील ओढणान्या व तोंडपुजेपणा करणाऱ्या इसमाची कशी फटफजिती उड़ते, 'हाही मार्ग बरा, तोही मार्ग बरा ' ह्मणून आस्ते आस्ते सुधारणा घडवून आणण्याची इच्छा करणा-या गृहस्थाचें कसें दुटप्पी वर्तन असते व त्याला किती धोरणे संभाळावी लागतात, जुन्या गृहस्थितीतील बायकांची साधीभोळी वागणूक आणि गृहसौख्य व नव्या कुटुंबांतील स्त्रियांची सुधारणच्या साच्यात झालेली हाडेपूड वगैरे गोष्टी मोठ्या मार्मिकपणे यांत गोविल्या आहेत. या नाटकाचे प्रयोग पुणे येथील ' राष्ट्रहितेच्छु' नामक खाजगी मंडळीनें