निघाला पाहिजे, शोकाचे वेळीं कंपित व किंचित् तुटक तुटक
असा स्वर असावा लागतो, भीतीचे वेळीं केव्हां एकदम वरच्या
पडज्यांत आरोळी निघते, तर केव्हां खरजाच्या खालींही आवाज
पडून बोबडी वळते. तात्पर्य, गद्यनाटकांत सुद्धां निरनिराळ्या
प्रसंग निरनिराळे रस उत्पन्न करावयाचे झाले तर रागबद्धसंगी
ताचेच अवलंबन करावें लागतें; व अशा प्रसंगी रसाला अनुकूल
स्वर काढतां न येणा-या इसमानं भाषण केले किंवा जात्याच
कर्णकटु किंवा दोषी असलेल्या आवाजीच्या माणसाचे भाषण
सुरू झालें, म्हणजे पुष्कळ वेळां श्रोत्यांचा विरस् होतो व ते
अपमानदर्शक टाळ्या वाजवितात, त्यामुळे रंगाचा बेरंग होऊन
जातो. संगीत तर या रागबद्ध प्रकाराची अत्यंत
अवश्यकता आहे. कारण असल्या नाटकांत पदयें असून तीं
रसास अनुकूल अशा रागरागिणींत घातलेली असतात, त्यामुळे
वर्ज्यावर्ज्य सुरांकडे लक्ष देऊन व यथोचित आरोहावरोह ठेवून
तीं शाखीय पद्धतीने सुरेल अशीच म्हटलीं पाहिजेत. अलीकड
च्या पुष्कळ नाटकमंडळ्या ( यांतच किर्लोस्कर मंडळीही येते.)
कालप्रसंगाकडे लक्ष न देतां रागांची हवी तशी भेसळ करून
' हम करे सो संगीत ' बनवून प्रयोग करुं लागलेल्या आहेत.
पण त्यायोगार्ने रसहानि होऊन संगीत म्हणजे एक प्रकारची
थट्टा होत चालली आहेजी आपली गानविद्या आज हजारों
वर्षे कायम राहून अजूनहीं रहमतखांसारख्या तिच्या निस्सीम
भक्तांचे गाणें सुरू झालँ लण्जे केवळ मनुष्य नव्हे तर पशुसुध्दां
आहारनिद्रा वाकून तीने होतातत्या विवेची रचना फारच
खुबीदार शास्त्रीय पद्धतीने झाली आहे: व या शाखाय
पद्धतिचें बिनचूक रीतीनें जो अध्ययन करील तो दगडाला
सुद्धां पाझर फोडील म्हणतात, त्यांत कांहींच तथ्य नाहीं
असें नाही. पण या कलेला उत्तेजन नसल्यामुळे दिखतें
दिवस ती बुडत चालली आहे, व अलीकडील नाटकमंडळ्यां
च्या संगीतारून तर ही कला ठार बुडविण्याचा त्यांनीं विडाच
उचलला आहे असें दिसतं. गवई लोक ख्याल टप्पे जसे शास्त्रीय
पान:मराठी रंगभुमी.djvu/२८९
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५५
भाग ३ रा.