आणि उदात्त वृत्ति पण दाखवावी. कार्यवशात्, त्यानें रजोगु
गुणाचा अंगिकार करावा व कारणपरत्वें तमोगुणाची केवळ
साक्षात् मूर्तिच आपणास बनवावी. तात्पर्यं प्रत्येक पात्रानें आपा
पल्या कार्यापुरतें प्रपंचाशी तादात्म्य करून, आपलें संसारात्मक
स्वरूप सर्व परिषदेत आणि श्रोतृजनास दाखविलें पाहिजे; व
तेणेकरून आपल्या क्रियानुसार आणि आचरणानुरूप सुखदुःखात्मक फल कसें भोगावें लागतें याचे प्रत्यक्ष प्रतिबिंब अखिल
जनसमूहाच्या हृत्पटिकेवर सहजगत्या उमटविलें पाहिजे.
पानें ८६|९३.
तीन मुख्य अंगे -कोणताही नाटकप्रयोग चांगला वठण्यास पुढील तीन गोष्टींची अवश्यकता लागते. (१ ) रागबद्ध संगीत; (२) सरस नाटक व (३) उत्तम पात्रे हें नियम संगीत नाटकास जसे लागू आहेत, तसेच गद्यनाटकासही लागू आहेत. आतां गद्यनाटकासंबंधाने शेवटचे दोन नियम जसे सामान्य वाचकांच्याही सहज लक्षांत येण्यासारखे आहेत तसा पहिला म्हणजे रागबद्धसंगीताचा नियम येणार नाही; किंबहुना पुष्कळांना गद्यनाटकास रागबद्धसंगीताची जरूर लागते म्हणजे काय हें समजणे कठिण पडेल. यासंबंधार्ने विशेष विवेचन येथे न करितां थोडक्यांत असें सांगतों कीं, संगीत नाटकांत निरनिराळे रस वठविण्यास जशी निरनिराळ्या रागांची रचना केलेली असते तसेच गद्यनाटकांतही निरनिराळे रस उत्पन्न करण्यास निरनि राळे उंचनीच स्वर खरेलपणानें काढावे लागतात. ह्मणजे साधा रणपणे गद्यनाटकांतही स्वर, राग व रस यांचे साहचर्य असते, असें म्हणण्यास कांही हरकत नाही. गद्यनाटकांतील वीररसात्मक भाषणांत पुळपुळीत आवाज न काढतां ठसून व जोरदार काढला पाहिजे, उदात्त कल्पना किंवा विचार मनांत घोळत असले तर त्याला अनुसरून सौम्य पण अखंड व गंभीर आवाज