Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५६
मराठी रंगभूमि.

पद्धतीनें तास तास म्हणतात, तशी नाटकांतील पद्यें म्हणतां येणार नाहीत. याच कारणासाठी मराठी संगीत नाटकांच्या पहिल्या कवींनी ख्याल, टप्पे, वगैरे वर्ज करून ठुंबऱ्या, लवण्या, पदे मात्र उचलिली, असें ह्मणतात; पण आतां यांना पदेही झेंपतनाशीं झाली आहेत. पार्शी चालीचीं ठेक्यावरची पदे दिवसानुदिवस आमच्या संगीत मंडळ्या उचलीत आहेत. रागबद्ध संगीताचा प्रकार नाटकांतून घालतां येणार नाही. हें म्हणणें चुकीचे आहे. रागदारींतील एकेक पद्य तास तास म्हणून नाटकांत कधीही चालावयाचें नाहीं व अशानें नाटकाचा प्रयोग लवकर आटपणार नाहीं हें खरे; पण तेवढ्याने रागबद्धसंगीताचा प्रकार नाटकांत आणण्यास कांही हरकत येते असें नाहीं. रागाचे स्वरूप कायम ठेवून प्रसंगास अनुसरून योग्य पात्रांकडून सरस पद्ये म्हणविलीं तर नाटक लोकप्रिय झाल्यावांचुन कधीही राहणार नाही; व किर्लोस्कर मंडळीचे मूळ उत्पादक यांनी जी विशेष गोष्ट केली तीं हीच होय. हल्ली उठणें संगीत, बसणें संगीत, निजणें संगीत, शिकणें संगीत, फार काय, मरणेसुद्धां संगीत झाल्यामुळे व 'वड्यांची' 'विटाळ्याची' आणि 'कोंदणाची' पद्ये कोंबकोंबून नाटकांत भरल्यामुळे नाटकांतील पात्रांस जसे त्यांचे अजीर्ण होतें तसाच प्रेक्षकांस त्यांचा वीट येतो, व त्यामुळे 'वन्समोअर-नोमोअर'चे झगडे चालून गाणारें पात्र खजील होते व त्याला काय करावें हें समजत नाही. कै. किर्लोस्कर यांनी जी मंडळी जमविली होती, तीवर असा प्रसंग कधीही आला नाही. उलट वन्समोअरचा एकच ध्वनि दुमदुमत राहिल्यामुळे पात्रांना हुरूप येऊन त्यांच्या हातून अजब करामत होत असें.
 नाटकें- प्रयोग उत्तम वठण्यास नाटक सरस पाहिजे ही दुसरी गोष्ट होय. सरस नाटकाची जी लक्षणे आहेत त्यांत प्रसादयुक्त पद्ये, उदात्त व गंभीर कल्पना, पात्रांचे योग्य स्वभाव बनविंणे, संविधानकचातुर्य व प्रसंगांस अनुसरून भाषणे ही मुख्य होत. हीं लक्षणें लागू असणारी किती नाटकें हल्लींच्या संगीत मंडळ्या