पान:मराठी रंगभुमी.djvu/२८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५३
भाग ३ रा.


पद्ययोजनेस नवीन वळण मिळण्याचा संभव आहे. रा. देवलांनी शारदा नाटकांत नवीन चालींची योजना केली आहे त्यावरून प्रौढ व मधुर रचना करण्याची शक्ति व चालींची निवड करण्याइतकें धोरण कवींच्या अंगी असल्यास या चालींचा उपयोग कित्येक ठिकाणी चांगला होता असे दिसुन येतें.

सयाजीविजय-लेखक शारदाश्रमवासी

१६ मे १९०३.


नाटकांतील पात्रे, त्यांची योजना व
वस्त्राभरणें.

 कोणत्याही नाटकांतील अगर रंगभूमीवरील पात्रें बहुतकरून अवश्य तेवढेच असतात. तथापि, त्यांतील एक दोन अथवा क्वचित् तीन चार पार्ने सर्वांहून श्रेष्ठ व निःसंशय विशेष महत्वाचीं अधून, तह्यतिरिक्त इतरे भूमिकांची योजना, हा मुख्य पात्रांच्या व्यापारास व्यंजकता आणण्याकरितां, किंवा त्यांच्या मनोविकारांस पुष्टी देण्याच्या हेतूनें, अथवा त्यांचे मनोधर्म जागृत व्हावेत म्हणून, अगर त्याच्या चेष्टांस प्रतिबंध करण्यास्तव यद्वा त्यांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठींच केलेली असते. इतकेच नव्हे तर, हीं पात्रं जितकीं सुचक व चटकदार, अथवा विशेष मोहक, मनोरंजक आण चित्ताकर्षक होतील तितक करण्याकडे, प्रत्येक कवीचे लक्ष सर्वशीं वेधलेले असतें. ग्रथनवैदग्ध्य किंवा संविधानकचातुर्य हाच कायतो नाटकां तील प्रधान गुण असल्यामुळे, तो ज्या ज्या नाटकांत जितक्या जितक्या अंशानें पूर्णत्वास येतो, तितक्या तितक्या अंशानें त्या त्या रुतीचे कर्ते अखिल जगाच्या योग्य स्तुतीस व सर्व लोकांच्या उचित आदरास पात्र होतात, यांत लेशमात्रही शंका नाहीं ...प्रत्येक पात्राने आपापल्या भूमिकेस योग्य असेंच रूप धारण करावें, आणि उचित वस्त्रें नेसावी. त्याचप्रमाणें त्यानें अनुरूप अलंकार घालावे व प्रसंगानुसार गंभीर, सात्विक, उदार