पान:मराठी रंगभुमी.djvu/२८०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४६
मराठी रंगभूमि.


भाग्य आमच्या सभ्यतेचें कीं, अद्याप अशा अभिनयाचें वेळीं ' वन्समोअर 'ची गर्दी उसळूं लागली नाहीं !

विविधज्ञानविस्तार,-लेखनव्यवसाय १९००.

पात्रानें आंखलेल्या मर्यादेच्या बाहेर भाषण
किंवा अभिनय सहसा करूं नये.

 नाटकामध्यें जीं हलक्या दर्जाचीं पात्रें असतात त्यांना जणुं काय काळ स्थळ यांची परवा न ठेवतां वाटेल तो वात्रटपणा भाषणांत किंवा अभिनयांत करण्याची परवानगीच आहे, अशी पुष्कळांची समजूत असावीसें दिसतें. पण हा प्रकार अगदीं गैर आहे. आमच्या मतें असल्या पात्रांनी त्यांना नाटककर्त्यानें आंखून दिलेल्या मर्यादेच्या बाहेर जातांच कामा नये. असलीं पात्रे केंवळ मौजेकरतां एकंदर नाट्यसंविधानकास व त्यांत् सिद्ध केलेल्या विचाराचारास शोभतील व तशीच रसपोषक होतील अशा बेतानेंच योजलेली असतात. यांना मर्यादेचा अतिक्रम करण्याची थोडी मुभा दिली असतां मग हीं इतकीं अनावर होतात कीं मूळ नाटकाचा पोक्तपणा त्यांच्यापुढे बिलकुल टिकत नाही. " श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूचे " जें एक जुन्या तऱ्हेनें नाटक होत असतें, त्यांतली सुमेरसिंग आणि गजाऊ हीं पात्रें मनांत आणावींत. याच दोन पात्रांच्या सर्व तऱ्हेच्या अमर्यादपणांनीं तें सारें नाटक इतकें व्यापून जातें कीं, त्यांतलीं नायकनायिका हींच दोन पात्रे आहेत कीं काय, असा भास झाल्यावांचून रहात नाहीं. या नाटकांतली मुख्य कळसूत्री बायको जी आनंदीबाई तिचा कारस्थानीपण, सखा रामबापू यांची कावेबाजी, राघोबादादा यांचा शूर खरा पण भोळवट व स्त्रीलंपट स्वभाव आणि नारायणरावाची बालवृत्ति ह्या सर्व गुणांना आपला ठळकपणा सुमेरसिंग, गजाऊ या. दोन मुलूखमैदान तोफांच्या भडिमारापुढें राखतां राखतां नाकीं नष येतात ! सारांश, हलक्या प्रतीच्या पात्रांनी त्यांना नाटकक