पान:मराठी रंगभुमी.djvu/२८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४७
भाग ३ रा.


त्त्यानें पूर्वापर विचारपूर्वक जो रेषा ठरवून दिलेल असते तिचा सहसा अतिक्रम न होऊ देण्याविषयीं फार जपलें पाहिजे. उत्तम चिताऱ्याच्या तसबिरींत ज्याप्रमाणें मुख्य भाग आणि परभाग ( Back ground ) असे दोन स्पष्ट प्रकार असतात त्याप्रमाणंच नाटकाच्याही रचनेचे आहे. पहिला प्रकार ठळक रंगांनी आणि दुसरा फिक्या रंगांनी चितारलेला असतो. आणि तसा अतेल तरच चित्र उठावदार य दर्शनयोग्य असे दिसतें.
 आतां अशा प्रकारच्या फाजीलपणांनीं प्रेक्षकसमुहांतील सामान्य समजुतीचीं माणसे खुष होतात हें स’ आहेव त्यांच्या हंसण्याने किंवा टाळ्या वाजण्याने या प्रकारास गैरवाजवी उत्ते जन मिळून हे अधिकाधिक वाढत असतात. पण समंजस लांकां च्या दृष्टीला हा गैरशिस्तपणा तिरस्कार्य झाल्यावांचुन राहत नाही. अशा योग्यतेचा एखादाही प्रेक्षक नाखुष न होण्याबद्दल खबरदारी घेणें हें नटाचे मुख्य कर्तव्य आहे. शेक्सपिअरनें हँम्लेटकडून नटांना जो सुंदर उपदेश करविला आहे त्यांत चासंबंधाचे सांगितलेले शब्द ध्यानांत ठेवण्यासारसे आहेत. कित्येक नाटकपात्रें अभिनयांत फाजीलपषा करतात त्याबद्दल हेल्मेट म्हणतोः
  Now this overdone, or come tardy off, though it make the unskillful laugh, cannot but make the judicious grieve; the censure of which one must in your allowance o'erweigh a whole theatre of others."
तथापि एखादे वेळीं कुशल नटानें आपली कांहीं समयसूचकता दासांवल्यास ती अग्राय असें नाहीं. समयोचित भाषण किंवा अभिनय हा तर नटाचा प्रधान गुण होय. पात्राचे पूर्वापर धोरण राखून तो योग्य रीतीनें दासविंता येईल तर नटाच्या कौशल्याची ती तारीफ करण्यासारखीच गोष्ट म्हटली पाहिजे.