पान:मराठी रंगभुमी.djvu/२७६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४२
मराठी रंगभूमि.


 नाटकांत विषय, कल्पना अणि कार्य अशा तीन गोष्टी असतात. यांपैकीं कल्पनेंतच नाटकाच्या कार्याचें खरें बीज असतें. नाटकाचा विषय कितीही सुंदर असला, तरी पण जोंपर्यंत त्या विषयाचें कल्पनेंत रूपांतर होत नाहीं तोंपर्यंत तें नाटक विरसच राहणार यांत संशय नाही. हें रूपांतर करण्यांतच नाटककर्त्याचा अंगच्या खऱ्या चातुर्याची परीक्षा होते. नाटकाच्या विषयाचे मर्यादा हवी तेवढी विस्तृत घ्या, किंवा याच्य उलट रूढ आचारविचार, रुचिवैचित्र्य आणि मतभेद यामुळें संकुचित झालेली घ्या, त्या विषयाला कल्पनेचें रूप प्राप्त होईपर्यंत खन्या नाटकरचनेला प्रारंभच होत नाहीं असे दिसून येईल. उदाहरणार्थ, स्त्रियांचे केशवपन हा विषय आपण घेऊ. या विषयासंबंधाने रूढ आचार, मतभेद वगैरे पुष्कळ असल्यामुळें विषयाची मर्यादा फार आकुंचित झालेली आहे इतकें आहे. तथापि कुशल नाट्यकार भेटल्यास तो याच विषयाला कल्पनेचें सुंदर प्रावरण घालून कथानकाला असें उत्कृष्ट सजवील कीं, त्या नाटकाचा ठसा प्रेक्षकांचे मनांतून कधींही नाहींसा होणार नाही. सारांश, कसाही विषय घेतला तरी त्या विषयाचें कल्पनेंत यथास्थित रूपांतर करण्याचें चातुर्य नाटककर्त्यानें संपादिलें पाहिजे.
 नाटकांतील क्रियेंत एकता ( unity of action ) असली पाहिजे. ही एकता ग्रीक नाट्याचार्यांच्या मतें स्थल, काल आणि नायकनायिका अशा तीन बाबतींत अवश्य पाहिजे. मानवी चरित्रांतल्या विविध गोष्टी, ऐतिहासिक कथा, आणि चिरस्मरणीय प्रसंग हे सगळे या भवसागरावरील तरंगाप्रमाणे होत. त्यांना एकत्र करून त्या सर्वांचें मिळून एक कार्यं बनविण्यास नाटककर्त्याची कल्पनाशक्ति हीच एक समर्थ आहे. ह्यण्जे नाटकांत क्रियेची अथवा व्यापाराची एकता याचा अर्थ एवढाच कीं नाटकांत येणारे नानाविध प्रसंगाची सूत्रबद्धता. नाटकांत एकच क्रिया अथवा एकच प्रसंग असावा असाही कित्येक पंडित या पारिभाषिक संज्ञेचा अर्थ करतात. परंतु तो निःसंशय चुकीचा