पान:मराठी रंगभुमी.djvu/२७७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४३
भाग ३ रा.


आहे. मुख्य प्रसंग अथवा क्रिया एकच असली पाहिजे ही गोष्ट खरी, तथापि गौण क्रिया अनेक असण्यास कांहीं प्रत्यवाय दिसत नाही. नाटककर्यांनीं एवढी मात्र खबरदारी घेतली पाहिजे की, मुख्य क्रियेस गौणता किंवा गौण क्रियेस मुख्यता कधी दिली जाणार नाही. शेक्सपिअर याच्या कृतींत इतर नाटककारांपेक्षां जो विशेष आहे तो हाच. नायकनायिका यांच्या एकतेसंबंधानें तसेच समजावें. नायक व नायिका एकेकच असावी असें म्हटलें म्हणजे बाकीचीं पात्रं कुचकामाचीं खोगीरभरती असावी असा अर्थ नाही. गुणांत नायक किंवा नायिका यांच्या खालोखाल अशी पानें अंसण्याने नाटकाच्या रंगाची हानि न होतां उलट विशेषच शोभा येते. परंतु नायक व नायिका यांना त्यांच्या उच्च भ्रष्ट करून त्यंचे जागी एका आगुंतक आणून बस विणें मात्र कधी योग्य होणार नाही. योग्य स्थान योग्य पात्राचीच नेमणूक झाली पाहिजे. स्थल व काल यांची एकता म्हणजे एकच स्थलीं व एकाच दिवशी कथानकांत वर्णिलेले सर्व प्रसंग घडवून आणणें. अशा रीतीनें कथानकाची व्याप्ति एकाच दिवसापुरती करण्याबद्दल ग्रीक नाट्याचार्यांचा कटाक्ष होता. परंतु हे नियम झणजे नाट्यदेवतेच्या पायांत निरर्थक श्रृंखला होत. त्यापासून नाटकास विशेष रंग चढणे तर दूरच, परंतु अस लेल्या शोभेचीही एकरूपतेमुळं हानि व्हावयाची. शेक्सपिअर व कालिदास या दोघांनी या नियमास झुगारून दिलेले आढळतें. शाकुंतल नाटकाच्या पहिल्या अंकांत दुष्यंत व शकुंतला यांची दुष्टदृष्ट होते व परस्परांचे मनांत प्रेमांकुर उत्पन्न होतात; आणि शेवटल्या अंकांत पहावें तो त्यांच्या प्रीतीिचें दृश्य फल जो भरत तो इंद्रलोकीं सिंहाचे पाठीवर बसून त्याची आयाळ ओढीत बसलेला दृष्टीस पडतो. येथे कालाची एकता कोठे राहिली ? शेक्सपिअराविषयी अगदीं तरेंच आहे. शेक्सपिअरच्या अथे नाटकांत के प्रसंग घातले आहेत त्यांतले कांहीं व्हेनिस येथे आणि कांहीं सायप्रेस बेटांत घडलेले दाखविले आहेत; तेव्हां येथे स्थलाची एकता कोठें राहिली ? तथापि, या नियमभंगामुळे