पान:मराठी रंगभुमी.djvu/२७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३९
भाग ३ रा.


रसिक मनष्यानें ठरविलें पाहिजे. मेकॉले साहेबांनी कवितेची जी व्याख्या केली आहे ती आमच्या संगीतास बरीच लागू पडते. सुस्वर आणि मधुर अशा स्वराच्या एकतानतेने चित्तवृत्ति तल्लीन करण्याचा संगीताचा मुख्य हेतु आहे. श्रवणेंद्रिय तल्लीन झाल्यावर अंतःकरणांत आनंद उत्पन्न्न होतो. मनोरंजन हाच संगी ताचा प्रधान हेतु आहे. विचारशक्ति प्रदीप्त करण्याला किंवा मनो वृत्ति उचंबळून त्यायोगे वतनवर परिणाम करण्याचे कामीं संगीताचा (प्रस्तुत संगीताचा ) कांहीं तादृश उपयोग होत नाही असें झटलें पाहिजे; व लोकशिक्षणाचा उदात्त व प्रधान हेतु ज्या नाटककारांचा आहे त्यांनी संगीतापेक्षा गद्य नाटकांचाच उपयोग करावा अशी आमची त्यांस सुचना आहे. ‘ यागोच्या नीच व कुटिल कार स्थानान परवश झालेल्या अथेल्लोचे आत्मगत विचार ठुंबरीच्या रूपाने ऐकतांना. किंवा पितृवधाच्या सुडाकरितां तळमळणाच्या हॅमलेटने आपल्या आईची उच्छखल व अत्यंत स्वैर वर्तनाबद्दल केलेली कानउघाडणी दिंडीच्या रूपानें श्रवण करून, किंवा लेडी मॅकयेथसारख्या मूर्तिमंत कृत्येनें खुनासारखें भयंकर कृत्य कर ण्यास आपल्या नवऱ्याची केलेली उठावणी साकीच्या रूपाने श्रवणपथावर येऊन वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या मनावर कित पत परिणाम होईल हे प्रत्येकाने आपल्या मनाशींच ताडून पहावें. विचारशक्तीची जागृति व मनोवृत्तीची उठावणी करतांना मनो रंजनाचा हेतु गौण असून, लोकशिक्षणाच्या हेतूला प्राधान्य दिले जावें असें आमचे मत आहे व म्हणूनच दुर्गा किंवा झुंझा रराव याप्रमाणें हें नाटक गद्य झाले असतें किंवा मिसेस हेनरी वुडच्या ‘क्यांटरबरीज वइल' या धर्तीवर कादंबरीच्या रूपाने हें संविधानक लिहिलें गेले असतें, तर फारच उपयुक्त झाले असतें असे आह्वांस वाटतें.

विविधज्ञानविस्तार,सप्टेंबर १८९९.