Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३१
भाग ३ रा.


विभावादिकांविषयी लक्षांत ठेवण्या
सारखी गोष्ठ.

 विभाव (मनोविकाराची कारणें ) जितके उत्तेजक असतील तितकेच मनोविकार उत्कट किंवा मंद उत्पन्न होतील; व मनो विकार जसे उत्कट किंवा मंद असतील त्याच मनानें त्यांचे अनुभावही ( मनोविकार उत्पन्न झाल्यावर जी चिन्हें किंवा क्रिया होतात त कार्यरूप अनुभाव होत. हे मनोविकारांच्या मागून उत्पन्न होतात म्हणून, किंवा त्यांच्या योगानें मनोविकार उत्पन्न झाल्याचे दुसन्याच्या अनुभवास येतें म्हणून यांत अनु भाव असें नांव आहे. ) विशेष किंवा कमी प्रकट होतील. विभा वाचा परिणामही सर्व मनुष्यांवर एकसारखाच होतो असे नाही. ज्या मनुष्याचा जसा शांत कवा चंचलस्वभाव असेल, किंवा त्याचे जसें ज्ञान असेल, किंवा त्याची जशी अवस्था असेल, तशा प्रकारचाच विभावांचा त्याच्या मनावर परिणाम होईल. जसे, कोणी एका वनांत एकांत स्थलीं एखादी रूपवती स्त्री विहार करीत आहे, असें कोणी एका तरुणाने पाहिलें, तर त्यास रति उत्पन्न होऊन लवकर तिला प्रसन्न करून घेण्याचे त्याच्या मनांत येईल; तो उतावळा होऊन तिच्याजवळ जाईल, तिचे आर्जव करू लागेल, तिच्या पायां देखील पडेल ! परंतु तोच मनुष्य जर शांत स्वभावाचा असला तर त्याच्या मनांत विकार उत्पन्न झाला तरी तो एकाएक प्रगट न करितां युक्तिप्रयुक्तीने आपले इष्ट कार्य साधील. त्याचे अनुभाव विशेष स्पष्ट दिसणार नाहींत. तसेच पहाणारा एखादा वृद्ध ऋषि असला तर त्याच्या मनांत रतीचा प्रवेश देखील न होतां कदाचित् स्नेहादिक दुसरेच विकार उत्पन्न होतील. त्याकरितां कवीनीं ह्या गोष्टीचा चांगला विचार केला पाहिजे.

रसप्रबोध -पान २७.