Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३२
मराठी रंगभूमि.


कोणाचें हास्य कसे असावें ?

हास्यरसाचे सहा भेद आहेत ते असे:-
१. स्मित-मंदहास्य स्वर न होतां व दांत न दिसतां गाल तल्या गालांत जें हसणें तें.
२. हासित- मुख, नेत्र आणि गाल हे ज्यांत किंचित् विकसित होऊन कांहीसे दांतही दिसतात तें.
३.विहसित-कांहीसा मधुर शब्द व डोळे झांकणें हें ज्यांत असून ह्यसितापेक्ष कांहींचें अधिक स्पष्ट असतें तें.
४. उपहासितनाक फुगणं, कुटिल दृष्टि, स्पष्ट शब्द व मान हलणें यादृकरून युक्त जें हसणें तें.
५. अपहसित-ज्यांत शब्द फारच स्पष्ट, मान हलणें, डोळ्यांस अश्रु येणें हीं होतात तें.
६. अतिहसित-ज्यांत मोठ्या स्वरानें मस्तक हलवून जवळ बसलेल्या लोकांस आलिंगन देऊन त्यांच्या हातावर हात मारणे, अश्रूंचा लोट वाहणें, हें होतें तें.
 हे सहा प्रकार सांगण्याचे कारण असे आहे की, स्वभावावरून मनुष्याचे उत्तम, मध्यम आणि कनिष्ट असे तीन भेद मानिले तेव्हां जसा मनष्य असेल तशा प्रकारचे त्यास हास्य उत्पन्न होते. त्याविषयी साधारण नियम असा आहे कीं, जे लोक स्वभावाने शांत व गंभीर असतात ते उत्तम, त्यांचे हसणं स्मित आणि हसित असें असतें. मध्यमांचें विहसित आणि उपहसित असते आणि कनिष्ठ प्रतीचे लोक किंवा लहान मूलें यांचं हसणे अपहसित आणि अतिहसित असतें. कवि जनांनीं काव्यनायक किंवा काव्यांतील पात्रें जशीं असतील न्यांसारखे त्यांच्या ठिकाणी हास्य वार्णिलें पाहीजे.

रसप्रबोध-पान ४४.