पान:मराठी रंगभुमी.djvu/२६३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२९
भाग ३ रा.


ग्रंथकाराच्याचकडून होत असतो. पण असें करणें हें आत्महत्या करण्यासारखेच आहे, हें तत्व चांगलें विंबल्यास हा दोष बराच कमी होण्याचा संभव आहे.
 ज्याप्रमाणें नाटकाचा उद्देश एकच असला पाहिजे, त्याचप्रमाणें कथानकांतील भागही नैसर्गिक कारणांनी घडवून आणण्याची खबरदारी घेतली पाहिजे; आणि अकारण व आकस्मिक गोष्टी टाळवतील तितक्या टाळल्य पाहिजेत. खऱ्या जगांत दैवाचे खेळ ज्या मानाने आढळून येतात त्यापेक्षां नाटक रूप कृत्रिम जगांत त्यास मोकळिक दिल्यास संविधानक अस्वाभाविक बनून स्वतः प्रेक्षकांस तद्रूप बनवून सोडण्याची शक्ति त्यामधून निघून जाते. जोपर्यंत नायकनायिकेची संकटें किंवा मुखें स्वेच्छेनें न येतां सृष्टिनियमानुसार येत असतात, तोपर्यंत पहिल्याबद्दल कींव आणि दुसन्याबद्दल आनंद प्रेक्षकांच्या मनांत आपोआप उत्पन्न होतात. पण एकदां कांग्रीक लोकांतील जुन्या नाटकांतल्याप्रमाणें स्वर्गस्थ देव आपले अमृतपानादि कामधंदे सोडून मर्त्याच्या रंगभूमीवर अचानक उतरून ढवळा ढवळ करु लागले कीं, प्रेक्षकांची तद्रूपता स्वर्गी उडून गेली म्हणून समजावें. मग समोर नायक धडधडीत फांसावर चढत असला किवा नायिकेच्या प्रतिनायकाकडून छळ होत असला तरी त्याबद्दल प्रेक्षकांचा थवा अगदी निर्भय असतो; आणि आपलें अस्तित्व फार झाले तर विड्यांच्या धुराच्या लोळानें जाहीर करतो. एखाद्या दुःखद किंवा भयानक प्रसंगी एखाया प्रेक्षकाचे डोळे जड दिसले किंवा दुसरा एखादा आकरून बस लेला आढळला तर हे चमःकार अश्रुपातामुळें किंवा आश्चर्यामुळे झाले नखून झोपेच्या गुंगीमुळे व जांभईमुळेच घडून आले अशी खात्री बाळगावी.
 एकोद्देशत्व व निसर्गसिद्धता यांशिवाय तिसरा एक गुण चांग ल्या नाटकाचे ठायीं वसत असला पाहिजे. तो स्वतंत्रता हा होय स्वतंत्रता म्हणजे संविधानकांतील प्रत्येक गोष्टीची सिद्धता नाटक