पान:मराठी रंगभुमी.djvu/२६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२८
मराठी रंगभूमि.


इतर नायिकेचें रडणे-आणि तेंही तालसुरावर!-मंडळांच्या कानीं पडूं लागलें तेव्हां त्यांतलि खुमारी नाहीशी होऊन नाटक म्हणजे एक प्रकारची गंमतच होऊन बसली. याप्रमाणें नैतिक उपदेश आण नैतक सुधारणा बाजूस राहून नाटकें हं चैनीचीं आगरें होऊन बसली.

ज्ञानप्रकाश, ता. ७ मे १८९६



चांगल्या नाटकाचे गुण कोणते ?
(एकोद्देशत्व, निसर्गसिद्धता व स्वतंत्रता. )

 प्रत्यक नाटकलेखकाच्या समोर लेखनप्रसंगीं एकच साध्य वस्तु असावी लागते; मग तो उपदेशरूप असो किंवा नसो. हॅम्लेट नाटकांत वर्तनांत अनिश्चितपणा असल्याने काय परिणाम होतात हें दाखविण्याचा कविनें प्रयत्न केला आहे. शाकुंतल नाटकांत फक्त दुष्यंत व शकुंतला यांचा योग जुळवून आणणें हेंच कवीचें प्रयोजन आहे. तरी पण दोन्ही नाटकांत कर्त्यानीं एकएकच साध्य वस्तु आपणासमोर ठेविली आहे. ज्याप्रमाणे अनेक किरण एकाच केंद्रांत पडले असतां ती जागा प्रकाशमान व स्पष्ट दिस वयास लागते त्याचप्रमाणे प्रत्येक प्रवेशाचै, वाक्याचें किंबहुना शब्दाचें एकाच गोष्टींत पर्यवसान होईल अशा रतिची त्यांचा योजना केल्यास ती गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर चांगली ठसते. पण एकीच्या पाठोपाठ दुसरी, तिच्या मागून तिसरी, अशा प्रकारें एक धड ना भाराभर चिंध्या प्रेक्षकांपुढे मांडिल्यास त्यांचें मन पूर्ववत् कोरेंच रहातें. एका तान्हुल्याचें चांगल्या प्रकारें पोषण झालें नाहीं तोंच दुसर्या अर्भकानें जगांत उडी घालण्याचा घाई केल्यास पहिल्याचे व कांही अंशी दुसन्याचेंही शरीर नेहमी कमकुवत राहतें, हा नेहमींचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रयोजनें हातीं घेतल्यास एकाचही सिद्धि होत नाहीं, हें नवीन ग्रंथकारानें लक्षांत ठेविलें पाहिजे. पुढें आपल्या हातून ग्रंथरचन होईल की नाही, या शंकेमुळे म्हृणा किंवा इतर कारणामुळे ह्मणा आपले सर्व विचार एकाच भट्टीत ओतण्याचा दोष बहुधा नवीन