ळून येतो, व त्यामुळे बोधप्रद नसून नीरस असलेली अशा
बरीच नाटकें रंगभुमीवर येऊ लागली आहेत. ही स्थिति
काही अशा लोकाभिरुचि बिघडल्यामुळे आली आहे
यांत कांहीं संशय नाही. पण ऐपतदार व चांगल्या म्हणून
मानलेल्या कंपन्याही हाच कित्ता गिरवू लागल्या आहेत
हा शोचनीय गोष्ट आहे. नाटकांच्या निवडीप्रमाणेंच
पात्रांचीही योग्य निवड केली पाहिजे. मालकी किंवा
वशिला यावर संबंध त्यांत बिलकुल असं नये. तर गाणें,
देखणेपणा, ज्ञान व अभिनय इ. गोष्टींत निपुण असलेल्या
पात्रांसच चांगली कामें द्यवीं, व अशी व्यवस्था होईल
तरय प्रयोग चांशले होऊन कंपनीचा लौकिक वाढेल.
पात्रांच्या निवडीप्रमाणेच प्रयोगाचे शिक्षणही काळजी
पूर्वक झालें पाहीजे. अलीकडे पुष्कळ कंपन्यांत प्रयोगाचा
शास्ता म्हणून कोणी निराळा नसतो. कंपनीचे मालक
किंवा काम करणारे मुख्य इसम असतात त्यां
च्याच शिक्षणानें पात्रें तयार होत असतात; व हे मालक
किंवा मुख्य इसम बहुधा “ निमकच्चे सुशिक्षित ' असून
त्यांनी शास्त्राचे अध्ययन केले नसल्यामुळे ते सांगतील
तीच पूर्वदिशा होऊन बसते; एवढेच नव्हे तर, उलट
त्यांच्या ठिकाणी असलेले दोषही इतर पात्रांच्या आंगीं
शिरतात. याची उदाहरणे मुख्य पात्रांप्रमाणे किरकोळ पात्रें
केव्हां केव्हां बेसुर तान मारण्याचा व निर्भिड आणि
बेताल आभिनय करण्याचा जो प्रयत्न करतात त्यावरून
पान:मराठी रंगभुमी.djvu/२४२
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०८
मराठी रंगभूमि.