Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०९
भाग ३ रा.


कोणाच्याही प्रत्ययास येतील. हा प्रकार होऊ नये हाणून गायन व अभिनय ह्या दोन गोष्टी शिकविणारे दोन निरनिराळे गुरु पाहिजेत. संगीताच्या गुरूनं रागबद्ध संगी ताच्या पद्यांचा पात्रांकडून शास्त्रशुद्धपद्धतीने अभ्यास करवावा व त्यांना हवी तशी स्वतंत्रता न देतां प्रयोगाचे वेळींही त्यांच्यावर देखरेख ठेवावी. हाच नियम अभिन यासही लागू करून शास्त्रीय पद्धतीने ते शिकविले जावे हा प्रकार हल्लींच्या नाटकमंडळ्यांत मुळींच दिसून येत नाही; किंबहुना रागबद्ध संगीत आणि अभिनय यांची संगीत नाटकास अवश्यकताच नाही, असे मानून सर्व नाटकें चालली आहेत. याचा परिणाम संगीत नाटकाची कला ओहटीस लागून लोकाभिरुच बिघडत चालली आहे हा होय. ही स्थिति सुधारणें नाटकमंडळीच्या चालकांचे कर्तव्य आहे व हे त्यांनी अवश्य बजावलें पाहिजे.

नाटकांत स्त्रिया असण्यापासून फायदे व तोटे.

 आमच्या मराठी नाटकें करणार्या मंडळींपैकीं कांहीं मंडळींत स्त्रिया होत्या व हल्लींही आहेत. अशा स्त्रिया असण्यापासून फायदे आहेत कीं तोटे आहेत याचा थोडा विचार करू. नाटकांत स्त्रियांना घेणें हें पुष्कळ अंशीं इंग्लिश नाटककंपन्यांचे अनुकरण आहे. पण तिकडील समा जाची रचना आणि इकडील समाजाची रचना यांत पुष्कळ अंतर आहे. तिकडे स्त्रिया पुरुषांबरोबर समाजांत हिंडतात, फिरतात, बोलतात, बसतात, त्यामुळे उभय