Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०७
भाग ३ रा.


यांची यादी अगोदर तयार करून त्याप्रमाणें जोडणी झाली आहे किंवा नाहीं हें पाहिले पाहिजे. नाहीतर प्रयोगास सुरवात झाल्यावर ऐन वेळीं एखादा जिन्नस किंवा कपडा लागला म्हणजे कशी तरी त्याचा भरती करण्यांत येते व त्यामुळे पुष्कळ वेळां विरस होता. नाटकगृहांतील व्यवस्थापक म्हणजे दरवाजावर नुसतीं तिकिटे घेऊन आंत सोडणारा इसम नसून कोण मनुष्य कोणत्या दर जाचा आहे, त्याला काठ बसविलें पाहिजे, तिकीट न घेतां निमंत्रणावरून जर एखादा गृहस्थ आला असेल तर आदबी राखून त्याची बसावयाची व्यवस्था कोठे केली पाहिजे इत्यादि गोष्टी जाणणारा मनुष्य पाहिजे. या काम कित्येक नाटकमंडळ्यांचा हलगीपणा दिसून येत असून कित्येक कंपन्या पैशाच्या जोरावर मदांधपणे वागत असल्याचे दिसून येते. ही गोष्ट गैर आहे. कंपनी लो कांच्या जिवावर चालली आहे हे जाणून लोकांबद्दल होईल तितका सहानुभूति प्रगट करून त्यांची उत्तम व्यवस्था ठेवणें हें चालकांचे कर्तव्य आहे. असो; बाह्य व्यवस्थे प्रमाणेच अतव्यवस्थाहा चोख असली पाहिजे. हा व्यवस्था मुखत्वेकरून चांगल्या नाटकांची निवड, योग्य पात्रांची योजना व प्रयोगाचे उत्तम शिक्षण या तीन गोष्टींत पाहीजे. अलीकडे ‘घे नाटक कीं कर त्याचा प्रयोग’ अशी स्थिति झाली आहे, बुकिश नाटकासंबंधाने अद्याप तसा प्रकार दिसत नाही; पण संगीतासंबंधानें तो विशेष आढ-