पान:मराठी रंगभुमी.djvu/२४०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०६
मराठी रंगभूमि.


चालकांची अंतर्बाह्य व्यवस्था,

 नाटकमंडळीची अंतर व बाह्य अशा दोन व्यवस्था असतात. बाह्य व्यवस्थेत प्रयोगाचे वेळीं नाटकांतील पडदे व देखावे चांगले करणे, सामान जेथल्या तेथे व टापटिपीने लावणें, पोषाख व कपडेलते यथायोग्य वाप रणें, प्रयोगास वेळेस सुरवात करणे, इत्यादि जीं उपांगें आहेत त्यांचा समावेश होत असून नाटकगृहांतील प्रेक्ष कांसंबंधाच्या हरएक प्रकारच्या व्यवस्थेचाही यांत अंत भीव होतो. या व्यवस्थेकरितां दोन निरनिराळे इसम असणे जरूर असून त्यांच्या हाताखाली प्रसंगानुसार अधिक इसमही असले पाहिजेत. पाहिल्या इसमास सामा न्यपणें रंगभूमीचा व्यवस्थापक (स्टेज म्यानेजर) म्हणतां येईल व दुसऱ्यास नाटकगृहाचा व्यवस्थापक म्हणता येईल. स्टेज म्यानेजरनें ज्या नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर होणार असेल त्याला लागणारे साहित्य, कपडे, देखावे


(२०५ पृष्ठावरून चालू. )

तींनें त्यांनी व रा. मोरोबांनी देखील खासगी रीतीनें गाण्यांच पद्धत ठेविलीच नव्ह्ती" भाऊरावांच्या पाठीमागे त्यांचे काम करण्याकरितां आणलले इसम हे हा नियम मोडून वरचेवर खासगी गाण्यास जातात, व गेल्या साल फर्ग्युसन कॉलेजमध्ये एके प्रसंगी त्यांचे गाणे झाले त्यावेळी त्यांनी नाटकांतील पद्येंहीं झटलीं, असें वर्तमानपत्रांतन प्रसिद्ध झाले आहे. वरील नियमाप्रमाणें किर्लोस्कर कंपनीस सदर गोष्ट कमीपणा आणणारी आहे. सबब यापुढे कोणत्याही पानाच्या हातून हा नियम मोडला जाणार नाही, अशाविषयी कंपनीनें खबरदारी घ्यावी.