कारण असं कीं, पात्रें कोणत्या प्रकारची आहेत, तीं
कोणत्या वेळीं कर रंगभूमीवर येतात, त्यांचा आवाज
व गाण्याची ढब कशी आहे, इत्यादि गोष्टींसंबंधाने
प्रेक्षकांना जी जिज्ञासा असत ता या देखव्याजें नाहींशी
होते. वास्तविक नाटकाच संविधानक कसे आहे, पुढे
कोणकोणते प्रवेश आहेत, देखाव्याची मांडणी कसकशी
होणार, इत्यादि गोष्टींसंबंधानें प्रेक्षकगणाची जशी
जिज्ञासा असते तशीच पात्रांसंबंधानेही ती असणे इष्ट
आहे. म्हणून प्रारंभीं सगळ्या पात्रांची सरसकट " संगीत
कवाईत " न करतां पूर्वीच्या पद्धतीस अनुसरून दोन
तीन पात्रांकडूनच मंगलाचरण करवावे. त्यायोगानें मंग
लाचरणांत कोणत्याही प्रकारची उणीव न भासतां पुढे
पात्रांसंबंधाने प्रेक्षकांची जी जिज्ञासा असते तिचाही भंग
होणार नाही.
(१०) खासगी रीतीनें गाणे झाल्यास नाटकांतील
इसमांनीं नाटकांतील पदयें –विशेषतः स्वतःच पदयें- म्हणू
नयेत. कारण त्यायोगाने स्वतःच्या सोंगाचे वजन नाहीसे
होऊन नाटकाच्या धंद्यासही कमीपणा येतो.*
*कै. भाऊराव कोल्हटकर यांनी ‘‘नाटकाचा पेशा स्वीकार ल्यापासून खासगी रतिनेिं गाण्याचे त्यांनी अगदी सोडून दिलें होतें. स्वतःच्या फाययाकरितां ते जर आपल्या गुणाचा विक्रय मांडते तर दोन दोनशें रुपये दरमहा त्यांनी सहज कमाविले असते. परंतु त्यापासून आपल्या धंद्याचे महत्व कमी होईल अशा समजु-