पान:मराठी भाषेचा सरस्वतीकोश भाग 1-.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आगंतुक आगंतुक [ सं० आगंतुक पाहुणा ] वि० १ आलेला. २ वाट चुकलेला. ३ बाहेरचा. ४ आक- स्मिक, यदृच्छागत पु०१ पाहुणा. २ अगांतुक. ३ ग्रंथांत घुसडून दिलेला पाठ. छुआगंतुक लाभ पु० १ अनपेक्षित किं० अटकळीत नसलेला फायदा. २ ठराविक मिळकतीच्या व्यतिरिक्त मिळकत. आगंतुक व्रण पु० केवळ त्वचेवर झालेला फोड. आगप क्रि० वि० १ आगाऊ, ठरलेल्या सम- याच्या अगोदरचा २ हळवें धान्य ३०. १३७ ४ आगम [ सं० आ + गम् ( जाणे ) ] पु० १ येणें. २ प्राप्ति, लाभ, मिळणे. ३ उत्पत्ति प्रवाह. ५ दस्तऐवज ६ उत्पन्न मिळकत. ७ विद्या ८ तात्विक ज्ञान. ९ शास्त्र. १० वेद. ११ मार्ग, येण्याचा रस्ता. १२ नदीचें मुख. १३ फळ, परि- णाम. १४ प्रारंभ. १५ (व्या०) शब्दांत नवीन येणारा वर्ण. आगमनिर्गम पु० १ येणे आणि जाणे, २ प्रारंभ आणि समाप्ति ३ सर्व किं० समग्र काम किं० ब्यवहार. आगमरहित ज्याला दस्तऐवज किं● हक्क स्थापित करणारा लेख नाहीं असा आगम- संपादक पु० एकाद्या जमीनीचा किं० घराचा हक्क प्रथम ज्याणें संपादिला तो. आगमसापेक्ष वि० हक्क स्थापित करणारा दस्तऐवज जिच्या संबंधानें नाहीं अशी ( जमीन, वाडी, इ० ). आगमनिरपेक्ष वि० जी जमीन शंभर वर्षे कबज्यांत असल्याकारणानें जिच्यावर हक्क शाबीत करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवजाची, खरेदी पत्रकाची, दानपत्राची जरूरी नाहीं अशी ( जमीन इ० ).

आगमन [ सं० आ + गम् ( जाणें ) ] न० येणें. ' आगम' पहा. आगमाग पु० पत्ता; एकाद्या माणसाचा किं० पदार्थाचा तपास किं० शोध. आगर [ सं० आकर = साठा, समूह ] न० १ नारळ, पोफळ, केळ, ३० पदार्थ उत्पन्न होण्याचें किं० मीठ पिकविण्याचें जें क्षेत्र तें. २ स्थान; जो पदार्थ ज्या ठिकाणी वैपुल्याने आढळतो कि० उत्पन्न होतो, त्या पदार्थांचें तें ठिकाण हें आगर. ३ एकाद्या कलेत किं० विधेत निष्णात जो मनुष्य तो तिचें आगर; उ० रामभाऊ हे गाण्याचें आगर आहेत. उ० विश्वंभरशास्त्री वेदान्ताचें आगर आगवीस आहेत. ४ घराभोवतालची लहानशी लागवड, मिरच्या, कोथिंबीर, भाजी, इ० ची. - गांव न० नारळी, पोफळी, इ० च्या बागा ज्या गांवात विपुल आहेत असा गांव-वाडी स्त्री० फळ झाडें, भाजीपाला, इ० चा घराभोंवतालचा बाग. आगर [ सं० अग्र= टोक ] न० टोक, शेवट; उ० मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या आगरीं (कवितेंश). आंगर न० १ दुबेळक्याचे लाकूड जें वाटेच्या तोंडाला लाविलेले असतें, आणि ज्यांतून माणसांना जातां येते पण गुरांना जातां येत नाहीं. २ दुवेळ- क्याची लाकडे किं० फांचा कुंपण करावयासाठी रांगेनें पुरलेल्या असतात त्या प्रत्येक. आंगरखा [ म० अंग + राखणें ] पु० लांब- लचक डगला जो हिंदू लोक बाहेर जातांना अंगांत घालतात तो. आगरी वि० १ आगरा संबंधाचा. २ आग- रांत लावलेला, पिकविलेला, किं० उत्पन्न केलेला. ३ आगरांत काम करून पोट भरणारा. पु० एक जात. आगरूं न० शरीरांत कांहीं बिघाड झाल्या कारणानें गुदद्वारें जो मांसगोलक वाहेर येतो तो. आगल, आगली [ सं० अग्र-टोक ]. स्त्री० नांगर हाकणाऱ्याची बसण्याची जागा. आठ बैलांनी ओढावयाच्या नांगराच्या पुढच्या दोन जोड्यांच्या आणि मागच्या दोन जोड्यांच्या मध्ये ही बसण्याची जागा असते. आगला, आगली, आगल्या पु० नांगराला जुपलेल्या बैलांच्या जोड्यांपैकी अगदी पुढची जोडी, किं० ही जोडी हाकणारा जो मनुष्य तो. आंगवण स्त्री० १ इच्छा. २ शक्ति ३ छंद. ४ नित्यक्रम. ५ नवस, प्रतिज्ञा (जुन्या कवितेंत). आगवळ [ सं० अग्र + वल् ( वळणें ) ] पु० वेणी, अंबाडा, ३० घातल्यावर केशांची टोकें बांधावयाचा दोरा. आंगवला पु० साल, पाला. आंगवळा पु० संबंध, सहवास. आगवाडा पु० घराची पुढील बाजू. आगवीस [ म० आग+विझणें ] स्त्री० १ जंगलाला आग लागली असतां प्रत्यक्ष पेटलेल्या प्रदेशाच्या सभोवतालची झाडें झुडपें तोडून आग पसरूं न देतां जागच्या जागी विझविणें ( क्रि०