पान:मराठी भाषेचा सरस्वतीकोश भाग 1-.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आखडणे सारखें असतें. -पत्र, रथ पु० गणपति, ज्याचें वाहन उंदीर असतो. -भुज पु० मांजर. आखुडणे [म० अखूड होणें] अ० क्रि० अबूट होणें. २ ( पाऊस ) थांबणे. अखुडवण [ म० अखूड ] न० पाय रहाटाची माळ लांब झाली असतां तिचा कांही भाग दुमडून बांधून ठेवण्याची लहानशी दोरी. आखुडवत [ म० अखूड + सं० पल ] न० केळ, चवई, इ० ना कोक्याचे अगोदर जे लहानसें पान येतें तें. [हून कमी लांव. आखूड वि० तोकडा; विवक्षित किं०इष्ट लांबी- आखें [ हिं० आखा ] न०१ कंठाळ, पखाल, पडशी, गोणी, इ० चें एक अधुक. २ तेल, तूप, इ० भरावयाचा किं० साठवावयाचा कातड्याचा बुधला. आखेट [ सं० ] पु० १ शिकार. २ भीति. आखेटक [ सं० ] पु० पारधी. न० शिकार आखेटिक[सं०]५०१ पारधी २ शिकारी कुला. आखेर, आखेरी अ मध्यें पहा. आखोट [ सं० ] पु० अक्रोड. आख्या [सं० आ+ख्या ( सांगणें )] स्त्री० १ प्रसिद्धि ( चांगली किं० वाईट ); चांगला (किं० वाईट ) लौकिक. २ बाजारगप्पा; विशेष विश्वस- नीय नव्हे अशी बातमी. ३ नांव; टोपणनांव. आख्यात [ सं० आ +ख्यात ( सांगितलेले, वर्णिलेले )] वि० १ चारचौघांच्या तोंडी असलेले. २ सांगितलेले. न० १ क्रियापद. २. मंतरलेल्या दुंदु- भीच्या ध्वनीवरून मुहूर्त सांगणें. आख्याति [सं०आ +ख्या (सांगणें ) ] स्त्री० १ सांगणें. २ कीर्ति. ३ नांव. आख्यान [सं०आ +ख्या (सांगणें ) न०] १ सांगणें . २ जुन्या किं० प्राचीन वृत्तान्ताचें निवेदन. ३ गोष्ट, दंतकथा. ४ भारतादि इतिहास. ५ चारल. आख्यायिका [सं०आ +ख्या (सांगणें ) स्त्री० १ गोष्ट, कथा..२ गोष्टी सांगणारा गद्यग्रंथ. ३ गद्यग्रंथांत सांगितलेली गोष्ट. आग [ सं० आगस् = अपराध ] न० अपराध. आंग [ सं० अंग ] न० अंग पहा. आंगलट स्त्री० अंगाचा बांधा किं० गावांची ठेवण. आग [ सं०अग्नि = विस्तव ] स्त्री० १ विस्तव. २ विस्तवाचा भडका. ३ दाह. ४ तल्लखपणा, तापट- आगत पणा, तडफदारपणा. एकाद्यावर आग पाखढणें १ त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करणें. २ त्याला कठोरपणानें रागें भरणे. ३ त्याची निंदा करणें. आग लावणें कलागत उपस्थित करणें. आग रिघणे पतीच्या प्रेतावरोवर त्याच्या स्त्रीनें स्वताला जाळून घेणें. एकाद्या पदार्थाला आग लागणें तो फोर महाग किं० दुर्मिळ होणें. एकाद्या वरतूची आग वरसणें ती वस्तु अति प्रमाणांत होणें; त्या वस्तूचें वैपुल्य अतिरेकास पोचणें ; उ० पावसाची आग वरसली! आगीत उडी टाकणें किं० घेणं मूर्ख- पणाचें धाडसी कृत्य करणे. आगीत तेल ओतणें एकाथाचा क्रोध वाढेल अर्से कृत्य करणे किं० शब्द बोलगें. आगीवांचून धूर निघत नाहीं मूळांत कांही पाप किं० अपराध असल्याशिवाय बोभाटा होत नाहीं. कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें समाजांत कोणी कजाग माणसें असली पाहि- जेत आणि कोणी भांडणे विझविणारी माणसे अमली पाहिजेत (म्हणजे गंभत होते). आगीवांचून कढ नाहीं आणि मायेवांचून रढ नाहीं उष्णतेशिवाय पाण्याला कढ येत नाहीं आगि खन्या प्रेमावांचन मनुष्याला रडें येत नाहीं. आगजाळ्या वि० तलख, तापट, कजाग, किं० खोडकर माणूस किं० कृत्य. भागधाड स्त्री० १ अगीचा अनर्थ. २ जुलमी राजा. ३ उपद्रवकारक मूल. ४ छळणारा माणूस. आगपाणी न० १ नैटिक आसीड. २ मद्य, दारू. आगबोट स्त्री० वाफेच्या शक्तीनें चालणारें गलवत. आगलाव्या पु० भांडणें चेतविणारा. आगटी, आगटें स्त्री० न० १ शेकावयासाठों पेटविलेली लाकडें, कोळसे, गवत, ३०. २ शेकाव- याची शेगडी. ३ सोनाराची शेगडी. सोनाराचें पाहाणें आगटींत सोनार सोन्याचे कण शोधा- वयासाठी आगटीत सूक्ष्म नजर टाकीत असतो; लाभासाठी मनुष्य लोकांना क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीं- कडे लक्ष्य पुरवीत असतो. आगटी पेटविणें कला. गत चेतविणें. आंगठा, आंगठीं, आंगठेदाम इ० 'अ'मध्ये पहा. आगत [ सं० आगत = आलेला; आ + गम् ( जाणें ) ] वि० आलेला; येऊन पोंचलेला. आगतस्वागत न० आलेल्या पाहुण्याचे स्वागत करणें; आपल्या कडे आलेल्या माणसाचा सत्कार करणे.