पान:मराठी भाषेचा सरस्वतीकोश भाग 1-.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आगशी १३८ काढणें ). २ पुढे येणारें संकट निवारण. आगशी [म० आग + शिखा] स्त्री० आगीची ज्वाळा; आगीचा किं० जाळाचा झोत. आगस वि० अपेक्षित काळाच्या अगोदरचा क्रि० वि० अपेक्षित काळाच्या पूर्वी. आगसणें अ० क्रि० १ अपेक्षित काळाच्या अगोदर येणें, होणें, घडणें, इ०. २ लवकर येणे, होणे, घडणे, ३०. ३ अगोदर पक्क होणे. आंगसूट वि० चपळ; सुटसुटीत अंगाचा. आगळ [ सं० अर्गला = अडसर, बांधावयाची दोरी ] स्त्री० पु० दाराचा अडसर. पु० बैदुलांच्या किं० विटीदांडूच्या खेळांत जमीनीवर केलेली खळगी. आगळा वि० अधिक. आगा पु० १ पुढचा किं० दर्शनी भाग. २ आंगरख्याची पेशकळी व खुंटकळी यांच्या मधला भाग. वि० थोर. आगा [ फा०] पु० पंडित, धर्मशास्त्रज्ञ. आंगागवडी, आंगागणिक क्रि० वि० पृथक्- पणें ; प्रत्येकानें आपआपल्या परीनें किं० रीतीनें. आगांतुकी [ सं० आगंतुक - बाहेरचा ] स्त्री० न बोलावतां येणे. आगामी [ सं० आगामिन् = पुढे येणारा ] वि० पुढे येणारा; भविष्य काळचा. भागारा पु० अंकुर. आगारी स्त्री० १ अंकुर; डिरी. २ लागवड. आंगावो पु० मोठेपणा. आगाही पु० १ खवर. २ दक्षता ३ माहिती. आगाळा पु० जुडी, कोळें, आंगिक [ सं० अंग = शरीर ] वि० १ शरी- राने किं० गात्रांनी दाखविलेला किं० व्यक्त केलेला ; हावभावांच्या रूपाचा. २ शारीरिक, देहासंबंधाचा. आगिवळा [ सं० अग्नि, म० आग ] पु० १ भांडें स्वच्छ करण्यासाठी किं० त्याचा कलंक काढण्यासाठी त्याला आंच देणें. २ तुळया वगेरे, टणक करण्यासाठी त्यांना धुरावर धरणें. आगिवळी स्त्री० [ आग+वळ ] स्त्री० 9 अर्भाची ज्वाळा. आंगी [ मराठी ] स्त्री० १ लहान मुलांचा पायघोळ डगला. २ लांबलचक आणि पोकळ ढगला. आगीदुगी स्त्री० दुसऱ्यांच्या चुका, अपराध, आग्नेय मूर्खपणाचे चाळे, इ० ची वाध्यता. उ० मी कोणाची आर्गादुगी काढीत नाही किं० करीत नाही किं० उकरीत नाहीं. आगदुर्गात नसणे दुसऱ्यांच्या कृत्यांवर टीका न करणें; कोणाच्या व्यवहारांत नाक न खुपसणें ; कोणाच्या उठाठेवी न करणे. आगीमण्यार स्त्री० एक प्रकारचा विषारी साप. ( मण्यारीची एक जात. ) आगीमाशी स्त्री० एक प्रकारची दंश कर- ●णारी माशी. आंगूळ [सं० अंगुल = वोट, बोटाची रुंदी] न० बोटाच्या रुंदीचे माप किं० परिमाण; आठ यव रुंदीच्या दिशेनें एकमेकांस लावून होणारी लांबी. आगेमागे [हिं० आगे = पुढे; म० मार्गे ] क्रि० विशिष्ट स्थळाच्या किं० समयाच्या थोडेसें आलीकडे किं० पलीकडे. [ णारा मांसपिंड. आगेरूं न० कांहीं रोगामुळे गुदद्वाराबाहेर पढ- भांगोगडी क्रि० वि० पृथपणें ; व्यक्तिशः; प्रत्येकाला वेगळे वेगळें; उ० माझ्या मुलाच्या लग्नांत मी माझ्या कुळांना आंगोगडी एक एक मुंडासें दिलें. आंगोघडी क्रि० वि० क्षणोक्षणों; वारंवार; पुनः पुनः चवई, आगोठ (ट) स्त्री० १ पावसाळ्याच्या सुर- वातीचा काळ. २ संबंध पावसाळ्याचा काळ. आगोतली [ सं० अग्र ] स्त्री० केळ, इ० चा अग्राकडचा तुकडा भोजनार्थ घेतात तो. आंगोपती [ सं० अंग प्रति = प्रत्येकानें पृथक् ] क्रि० वि० पृथपणें; ज्याणें त्याणें आपआपल्या विचाराने आणि स्वतंत्रपणे; (इतरांची संमति न घेतां ); उ० ते चौघे भाऊ आंगोपती संसार करूं लागले म्हणून तें घर बुडालें. आगोस स्त्री० उग्ण काळाचा प्रारंभ; कोरडा ऋतु. आंगोस्ती स्त्री० शहारे, शिरशिरी 'अंगुस्ती' पहा. आगोळ पु० १ केशांची टोकें बांधावयाचा दोरा. न० रातांब्यांचा गर जो आमसुले तयार करण्यासाठी पिळून काढतात तो. आंगोळी [ सं० अंगुलि ] स्त्री० हाताचें किं० पायाचें बोट. आनेय [ सं० अग्नि ] वि० अग्नीसंबंधाचा.