पान:मराठी भाषेचा सरस्वतीकोश भाग 1-.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आक्रांत व्याप्त. ६ व्याकुल किं० विन्हरु झालेला; उ० मोहाक्रांत, लोभाक्रांत, चिंताक्रांत, इ०. रूपादा- फ्रांत वि० जिंकून घेतलेला. [ रडणें; विलाप. आक्रांत [ सं० आद् (रडणें ) ] पु० आक्रांतणे [ सं० आ + क्रम् ( चालणे ) ] अ० क्रि० व्याकुल होणें; 3० तें मूल भुकेनें आक्रांतले आहे. १३५ आक्रोश [ सं० आ +ऋश् (ओरडणे ) ] पु० १ मोठमोठ्यानें रडगें, ओरडगें, हाका मारणे. २ ओरडून कलकलाट करणे. आकसाबोकश क्रि० वि० मोठमोठे आणि लांबलचक सूर काढून रडणें किं० विलाप करणें. आंख [ सं० अंक ] पु० अंक, अंकडा. आंख [ सं० आई = डोळा ] पु० डोळा आणि कान यांचे मधील प्रदेश किंवा अंतर; कानशील. आंख [ सं० अक्ष= गाडीचा कणा ] पु० गाडीचीं दोन चार्के ज्या लोखंडी पहारे भोवती फिरतात ती; चाकाचा कणा. आंखटणें, आंखुटणे अ० क्रि० खिळचाला, लाकडाच्या धसाला, किं० दुसऱ्या कोणत्याही अणीदार पदार्थाला चिरगूट अडकून फाटणें. आखडणें [ म० अखूड होणें ] अ० क्रि० १ अखूड होणें, अकसणें. २ कमी होणें. ३ बंद पडणें. स० क्रि० १ अखूड करणें. २ आवरणे. ३ समाप्तीच्या पंथास आणणें आखडतां हात हाती घेतलेले काम बंद करणें, किं० कमी जोरानें, किं० कभी नेटाने चालविणे. आखडत्या हातानें कमी औदार्यानें; कमी जोरानें किं० उत्साहानें; कमी प्रमाणांत आखडतां हात घेणें कमी करणे किं० कमी प्रभाणांत करणें. हात आखडता घेणें अर्थ वरच्याच सारखा. आखंडल [ सं० ] पु० इंद्र. आंखणी, आंखणें 'अ' मध्ये पहा. आखंदुळणे [सं० आंदोलन] स० क्रि० चुली- वर भांड्यांत शिनत लावलेल्या पदार्थांच्या सर्व भागांत सारखी उष्णता मिळावी म्हणून तें भांडे चलीवरून उचलून दोन्ही हातांत घेऊन त्या भांड्याला हासडे देणें. आखु आंखा पु० नारळ वगैरे भर वयासाठी सुभाच्या दोरीचें जें जाळे करतात तें. आखर पु० ' अखर ' पहा. आंखरी [ सं० अक्ष ] स्त्री० 'अखरी' पहा. आखाड [सं० आषाढ ] पु० चैत्र, वैशाख, इ० जे हिंदूंचे बारा महिने त्यांतील चवथा; ज्येष्ठा- च्या पुढचा आणि श्रावणाच्या मागचा महिना. - -झढ स्त्री० आषाढ महिन्यांत पडणाऱ्या पावसाच्या पुष्कळ वेळ टिकणाऱ्या ज्या सरी त्यांतील प्रत्येक. -पागोळी स्त्री० घराच्या छपराच्या कौलांवरून पावसाचे पाणी जें खाली पडतें त्याच्या धारांना पागोळया म्हणतात. आषाढ महिन्यांतील ज्या पा गोळ्या त्या आपा (खा-) ड पागाळ्या. या पागोळ्या लग्नाच्या प्रथमवर्षी वधूनें पाहूं नयेत, पाहिल्या तर तें सासूला अनिष्ट होतें अशी समजूत आहे. आखाड- पाटी स्त्री० लग्नाच्या पहिल्या वर्षी जांवई आणि त्याचा बाप यांना पार्टीत घालून पाठविलेला नज राणा, खाऊ, खेळणी, धोतरजोडे, पागोटीं. इ०. आखाढभूति, आषाढभूति पु०१ प्राचीन काळचा ह्या नांवाचा एक लफंगा माणूस. २ लफंगेगिरी ३ खोटा सोवळेपणा. आखाडसासरा पु० नसता अधिकार किं० आधव्याचा अधिकार गाजवू पाहा- णारा पुरुष; अशा स्वाभावाच्या स्त्रीस आखाडसासू म्हणतात. आमचे " मराठी भाषेचे वात्रप्रचार, म्हणी, इ० " हे पुस्तक पहा. आखाडा पु० १ कुस्तीची जागा. २ कांहीं विशिष्ट कार्यासाठी एके ठिकाणी जमणारी मंडळी, किं० त्याचें एकत्र जमावयाचें ठिकाण. ३ चव्हाठा, अड्डा. आखाड्यांत उतरणें वादाला सिद्ध होणें. आखाडी [ सं० आषाढ ] वि० आषाढाच्या महिन्यांतील; आषाढाच्या महिन्यासंबंधाचा स्त्री० १ आषाढ महिन्यांतील पौर्णिमा. २ आषाढांतील जोराच्या पावसाच्या सरींपैकी प्रत्येक. आखाडी स्त्री० १ कमीपणा. २ तुटवडा. उ० यंदा आमच्या विहिरींत वैशाखांतच आखाडी पडली. आखात [ सं० खन्- खोदणें ] न० उपसागर. आखान [ सं० खन्- खोदणे ] पु० खण. ण्याचें हत्यार; कुदळ. आंखी स्त्री० झाडावरचे आंबे वगैरे तोडावया- साठी टोकाला जाळे असलेली लांब काठी. आखु [सं०] पु० उंदीर. - कर्णी, पर्णी स्त्री० एक वनस्पति, जिचें पान उंदराच्या काना-