पान:मराठी भाषेचा सरस्वतीकोश भाग 1-.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आकांक्षणीय पाटणें. आकाशाला किं० आभाळाला गवसणी घालणे अशक्य गोष्ट किं० आपल्या शक्तीच्या बाहे- रची गोष्ट करावयाला सजण. आकाशाची चौघढी करणे फार मोठें आणि जिकीरीचें काम करणें. एकाद्याला आकाश किं० आसमान ठेंगणे होणें तो गर्वाने फुगून जाणे. आकाश फाटलें त्याला ठिगळ कोण मारू शकेल ? ईश्वरी क्षोभाचें निवा- रण कोणालाही करवत नाहीं. आकाशकक्षा स्त्री० क्षितिज. आकाशगंगा, आकाशनदी स्त्री० १ रवर्गातील गंगा. २ आकाशांतील ताऱ्यांचा पट्टा, ज्यांत असंख्य तारे जवळ जवळ असून नदीच्या प्रवाहासारखा देखावा दिसतो तो. आकाशाची घाड किं० कुन्हाड स्त्री० देवी आपत्ति आकाश - दिवा, आकाशदीप पु० १ आश्विनी पौर्णिमे पासून का तिकी पौर्णिमेपर्यंत उंच काठीला किं० • झाडाला जो दिवा अडकावतात तो. २ अंधेरांत चाल- णाऱ्या जमीनीवरच्या प्रवाशांना किं० समुद्रांतील गलबतांना वाट दाखविण्यासाठी उंचावर लोवत सोडलेला दिवा. आकाशनगर, गंधर्वनगर न० आकाशांतील (कल्पित) नगर, गंधर्वोचें नगर. आकाशपाणी न० ताडी, माढी, इ० मादक द्रव्ये, जीं ताड, माड, वगैरे उंच झाडापासून, • काढतात. आकाशभाषण न० किं० आकाश- वाणी स्त्री० नाटकांत रंगभूमीवर न दिसणाभ्या पात्रांच्या तोंडी घातलेले शब्द. आकाशमंडप पु० आकाशरूपी मांटव. आकाशमुनि पु० उंट (विनो- दांत ). आकाशयान न० विमान. १३४ आक्रांत माणसांनी किं० पदार्थांनी गच्च भरलेलें. 30- आकाश मेवांनी आकीर्ण होतें. आकांक्षणीय, आकांक्ष्य वि० [सं० आ+ कांक्ष (इच्छिणें ) ] वि० इट; अपेक्ष्य. आकांक्षा [ सं० आ + कांक्ष (इच्छिणें ) ] स्त्री० १ इच्छा. २ अपेक्षा. ३ तपास, शोध. ४ मागणी. ५ ( व्या० ) अर्थाकरतां बाहेरच्या शब्दाची जरूरी ६ जरूरी, उणीव (इष्ट कार्यात). ७ शंका. आकांक्षापूरण न० १ (व्या०) वाक्यांत ज्याची जरूरी आहे असा शब्द योग्य स्थळी घालणे. २ जरूरीच्या वस्तु मिळविणे किंवा मिळवून देणें. आकांक्षित [ सं० 'आकांक्षा' पहा ] वि० १ इच्छिलेलें. २ जरूर असलेलें. आकीर्ण [ सं० ] आ (इतस्ततः ) + कीर्णं ( पसरलेलें; कृ=पसरणें ) वि० १ गजबजलेलें. २ आकुंचन [सं० आ + कुंच् (वाकणें, मुरडणें)] न० १ संकोचणे; अखडणें; थोडक्या जागेला व्याप- णारा होणे किं० करणे. २ वाकणे. ३ मुरगळणे, पिळणें. ४ जमा करणें. ५ संक्षिप्त करणें. ६. सैन्याच्या हालचालींचा एक प्रकार. आकुंचित [ सं० ' आकुंचन' पहा ] वि० १ अखडलेला. २ वाकलेला, पिळलेला. ३ संक्षिप्त केलेला. ४ चिवळ. ५ गोळा केलेला. आकुल [ सं० ] वि० १ पूर्ण, व्याप्त. २ विकळ. गोंधळलेला. ४ क्षुब्ध. ५ गुंतलेले ( केश, दोरा, इ० ). आकुलित [ सं० ] वि० 'आकुल ' पहा. आकृत [ सं० आ + कू (ओरडणें ) ] न० १ हेतु, अभिप्राय २ मनोविकार. ३ इच्छा. आकृति [ सं० आ + कृ (करणें ) ] स्त्री० १ आकार, रूप. २ चेहेरा. आकृष्ट [ सं० आ + कृप् ( ओढणें, खेचणें ) ] वि० १ ओढलेला, खेचलेला. २ एकाद्या विषयाकडे ज्याचें मन वेधलें आहे असा. आंकील न० सोललेली चिंच. आक्रंदणे [सं० आ + क्रंद् (रढणें, ओरडणें)] अ० क्रि० १ रडणें. २ ओरडणें, आरडणें. ३ आरडा ओरडा करणे. आक्रंदन [ सं० 'आक्रंदणें' पहा ] न० १ मोठ्याने ओरडणें. २ विलाप करणें. आक्रम [ सं० आ + क्रम् (चालणें ) ] पु० १ जवळ जाणे किं० येणें. २ हल्ला. ३ धरणें, पक- डणें, कत्रज्यांत घेणे. ४ मिळविणें. ५ चढाई करणें, वरचढ होणें. ६ वर जाणे, चढणें. ७ व्यापणे. आक्रमशक्ति स्त्री० आवांका, सामर्थ्य. आक्रमण न० आक्रम ' पहा. " आक्रमण [सं० 'आक्रम ' पहा ] स० कि० १ ओलांडणें. २ हल्ला करून घेणें. आसणें [ सं० आ + कृष् (खेचणें ) ] अ० क्रि॰ अखूड होणें; आटणें ( कापड इ० ). आक्रांत [ सं० आ + क्रांत ( ओलांडलेला; क्रम् =चालणें ) ] वि० १ ओलांडलेला. २ तु विलेला. ३ कत्रज्यांत घेतलेला. ४ जिंकिलेला ५