पान:मराठी भाषेचा सरस्वतीकोश भाग 1-.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आकर्ण क्रि० वि० कानापर्यंत उ० त्यानें आकर्ण दोरी ओढून वाण सोडला. आकर्णनेत्र वि० ज्याचे डोळे कानापर्यंत आहेत तो म्ह० विशाल नेत्रांचा. आकर्णवरी क्रि० वि० कानापर्यंत. [ ऐकणे. आकर्णणे [ सं० आकर्णन = ऐकणे ] स० क्रि० आकर्णन [सं० आकर्णन=ऐकणें] न० ऐकणें. आकर्णित [सं०'आकर्णन' पहा] वि० ऐकलेलें. आकर्षक [ सं०आ + कृप (ओढणें ) ] वि०१ ·ओढणारा. २ मोहक, चित्तवेधक. आकर्षण [सं० 'आकर्षक ' पहा ] न० १ ओढणें, खेचणे. २ आकुंचित होणें. आकर्षित [ सं० आ+कृष्= ओढणें ] वि० - ओढलेला; खेचलेला. आकलणें [ सं० आ + कल् ( गोळा करणे ) ] स० क्रि० १ बांधणे, आवळणे. २ समजणें, जाणणे, ग्रहण करणें. आकलन [ सं० ' आकलणें पहा ] न० १ बंधन; बांधणें. २ एकाद्या विषयाचें ज्ञान किं० ग्रहण. आकलित [ सं० 'आकलणें' पहा ] वि० १ -बांधलेला, जखडलेला. २ जाणलेला. ३ आटोक्यांत आलेला. आकल्प [ सं० आ (पर्यंत ) +कल्प (ब्रह्म- देवाचा दिवस ) ] क्रि० वि० १ ब्रह्मदेवाचा दिवस संपेपर्यंत. लेचाळीस कोटी वीस लक्ष वर्षे म्ह० ब्रह्म- देवाचा एक दिवस. २ जगाच्या अंतापर्यंत. आकस्मिक [सं० 'अकस्मात्' यापासून विशे- घण ] वि० अवचित घडून आलेले; पूर्वीची सूचना • नसलेले, आकळणें [सं० ' आकलन ' पहा ] स० क्रि० .१ बांधणें, आवळणे, जखडणें. २ जाणणें; समजून घेणें; ज्ञानाचा विषय करणें. ३ आटोक्यात ठेवणें, नियंत्रित करणें. आका, आकाबाई 'अक्का”, “अक्काबाई” पहा. आकांत पु० १ गोंधळ, कल्लोळ, २ तीव्र किं० असह्य उपद्रव. १३३ आकार [सं०] पु० १ आकृति, रूपरेषा, अरा. खटा. २ देखावा, स्वरूप. ३ चेहरा. ४ चेहेऱ्याव रील विकार; अंतर्गत विचारांमुळे चेहेन्यावर आलेली . मुद्रा. ५ अभिप्राय. ६ (सांख्य) ऐक्य; ऐक्यज्ञान. ७ एकाद्या माणसासंबंधानें किं० पदार्थांसंबंधाने मना- आकाश वर झालेला ग्रह. ८ एकाद्या कामाची, खर्चाची, इ० संबंधाची अटकळ, अदमास, किं० सुमार. ९ संभव. १० पद्धति, शैली. आकार दाखविणं देखावा दाखविणे, ढोंग करणें, वहाणा करणे. आकारास येणे १ समाप्त होण्याच्या पंथास लागणें. २ पुढच्या स्वरूपाची अटकळ बांधतां येईल अशा स्थितीत येणें. आकारबंद पु० जमाखर्चाच्या अजमासाचे आंकडे ज्यांत दाखल केले आहेत असा कागद किं० अर्से पत्रक. आकारमान न०१ आकार; रूपरेषा. २ पदार्थाच्या मोठेपणाचें परिमाण. आकार- शुद्ध वि० प्रमाणबद्ध आकार आकारशुद्धि स्त्री० प्रमाणांत अवयव किं० भाग असणे. आकारगोपन न० मनांतील विचार बाहेर पडू न देगें. आकारजमा स्त्री० अंदाजवसूल (याच्या उलट "वसूली जमा”). आकारण [ सं० ] न० आमंत्रण, बोलावणे. आकारणी [ आकार करणें ] स्त्री० १ अंदाज. २ गणती, हिशेव. आकारणें [सं० आकार ] स० क्रि० १ बोला- वणें. २ हिशेब करणें. ३ हिशेवांत दाखल करणे. ४ अजमास किं० अटकळ करणें. ३ आकारणें [ सं० ' आकार ' पासून ] अ० क्रि० रंगारूपास येणे; उ० हें घर, हा मांडव, हें चित्र, आतां आकारत चालले आहे; उ० ह्या मुलाचें अक्षर आतां वरेंच आकारत चालले आहे. आकालिक [ सं० " अकाल " पासून विशे- षण ] वि०१ अप्रासंगिक, अकाली किं० भलत्याच वेळी आलेला, झालेला, केलेला, इ०. २ क्षणिक, ३ निमित्त कालापासून दुसऱ्या दिवशी त्या वेळेपर्यंत असणारा. आकाश [ सं० ] मराठीत न०, संस्कृतांत न०, पु० १ आभाळ. २ पंचमहाभूतांपैकी एक. २ पोकळ जागा. ३ उघडा प्रदेश, मैदान. एका- द्याला आकाशपाताळ एक होणें तो गर्वाने फुगून जाणें. आकाशपाताळ एक होणें अति जोराचा पाऊस पडत असणे आकाशपाताळ एक करणे १ क्षोभ किं० कल्लोळ करणें; मोठमोठ्याने ओरडून एकाद्याला रागे भरणें. २ भुकेने व्याकूळ होऊन अतोनात रडणे ( मुलांसंबंधानें ). आकाशाला घेरा घालणे प्रचंड पराक्रम किं० भावाढव्य काम करणें; अशक्य म्हणून समजलेले काम अंगावर घेऊन तें पार