पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८७) ॥ ११ ॥ नातरी केव्हडा अंकुश । स्थूळदेहासी करी कासावीस । म्हणोनि तेजस्वी पुरुष । नसे वयाची अपेक्षा ॥ १२॥ अग्निस्फुलिंग केव्हडा । परी रक्षणमात्र जाळी तृणहुडा । म्हणोन स्थूळ नसे तो गाढा । जो तेजस्वी तोचि थोर ॥ १३ ॥ जरी मातली जंबुकावळी । तरी केसरीपुढे ती काय बळी । सनातरी उबगलिया अंशुमाळी । काय तिमिरें भांडती ॥ १४ ॥ -शिकलने लगा सागौन-जै. अश्वमेध. मुक्तेश्वरः- जज ओव्या माजी मार्जारपिलीया ऐसें कांखें । कुंजर बाळ कैसेनि झांके। अंधकारी पळतां अर्के । लोकदृष्टी न लोपे ॥ १५॥ -विराटपर्व, एकनाथ:- RAM ओव्या.मालिन का अहंकामादिक राक्षस । मागोन पावला जो यश । सुरवर पूजिती जयास। तोचि एक पुरुषार्थी ॥ १६ ॥ लोकलज्जेसी भिवोनि । ममता योषितेसि सांडिली ज्यांनीं । ये जनीं वनी त्रिभुवनीं । तोच एक पुरुषार्थी ॥१७॥ सर्व कर्मी कुशळपण । समता दया सेवी जयाची आंगवण । जया अहंममता नाही जाण । तोचि एक पुरुषार्थी ॥ १८॥ सद्गुरुवचनीं दृढभाव । गुरु म्हणे ऐसा निःसंदेह । म्हणोनि भजनी जयाचा उत्सव । तोचि एक पुरुषार्थी ॥१९॥ गृहकृत्यी उदासभूत । तयांत असोनि जो अलिप्त । कामिनीकामातें नातळत , तोच एक पुरुषार्थी ।। २० ॥ स्वयें न बोले वाटिवेसी । शत्रुनिर्दाळणी उल्हास मानसीं । आपपर नेणे रणभूमीसी । तोचि एक पुरुषार्थी ॥ २१ ॥ क्षात्रधर्मी निधडा पूर्ण । तृणप्राय देखे निजजीवन । रिपु निर्दाळी थोरसान । न म्हणे तोचि पुरुषार्थी ॥ २२ ॥ सर्व भूती दया पूर्ण । स्वकर्माविषयी सावधान । गुरुभजनीं उदित मन । तोचि एक पुरुषार्थी ॥ २३ ॥ जो न सांडी निजधर्मासी । स्वामिकाजी नव्हे आळसी । मातृपितृभक्ति जयासी । तोचि एक पुरुषार्थी ॥ २४ ॥ बहुसाल मिळती खद्योत । तरी न जिंकवे रवि एक । मार्जार काय व्याघ्रा सन्मुख । ठाण मांडोनि राहेल ॥ २५ ॥ पतंग आपले