पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटें बरें कार्य असो, तयाचा। विचारिजे की परिमाण साचा; कर्तव्य की जें विबुधैं विवेके | FDIA तें अन्यथा शल्य घडे विपाकें. ॥ ७॥ ३७ पराक्रम. rameston७परान श्रीधरः- ओव्या . या दृष्टीस न भरे केसरी । परी क्षणे गज विदारी । वज्र धाकुट परी । चूर्ण करी सकळ नगाचें ॥१॥ खुजट दिसे वामन । परी ढेंगांत आटी त्रिभुवन । घटोद्भवाची तनु सान । परी सागर समग्र प्राशिला ॥२॥ चिमणा-दिसे चंडांश । परी सकळ सृष्टी करी प्रकाश । तेंवी नरवीर राघवेश । त्याचा दास मी असें -रामविजय. सूर्य काय मुष्टींत झांके । चंद्र न लपे कदा कांखे । ऐरावत शक्राचा. देखें । लपेल कैसा पर्णकुटीं ॥ ४ ॥ सिंधु न माये रांजणीं । बोचक्यांत लपेल कदा अग्नी । मेरु कांखेसी घालुनी । कोणा लपवे सांग पां ॥५॥ मूर्खामाजी पंडित । अभाग्यांत श्रीमंत । क्लीबांमाजी प्रतापवंत । शूर कैसा झांके पो ॥६॥ लवणाचा घट थोर । आवरू न शके गंगापूर । वानरांमाजी रघुवीर । कदाकाळी झांकना ॥ ७॥ भूतांमाजी शंकर । किरडांमाजी धरणीधर । रंकांमाजी राजेंद्र । कदा झांकिला जाइना ॥ ८ ॥ कस्तुरी चोरिली चोरें । परी परिमळे हाट भरे । तसा कृष्ण न झांके हो सुंदरे । लपवितां कोठेही ॥ ९॥ भाषिक -हरिविजय. पहा दीपककळा असे केव्हंडी । परी अंधकाराची नगरें मोडी । लघुवज्र परी आपले प्रौढी। कडेचि पाडी पर्वताचे ॥ १० ॥ पहा केव्हडा सिंहनंदन । उपजतांचि करी गजविदारण । की गंगा बिंदुप्राशन । करितां नाशी पातककोडी