पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आन संसारीं ॥ २३ ॥ क्रोध केवळ 4 मांग । कांधे अपवित्र 4 सर्वांग । साधिल्या कार्या केल्या भंग । क्रोधे सांगे नागविलें ॥ २४ ॥ बुद्धि साधिलियापाठी । क्रोध संचरला पोटीं । लंका जाळिली क्रोधदृष्टी । सीता गोरटी समवेता ॥ २५ ॥ क्रोधा ऐसा महावैरी । जडला असतां निज जिव्हारी। जो ज्ञानाची मानी थोरी । तो संसारी अतिमूर्ख ॥२६॥ क्रोध येऊ न देती दृष्टी । धन्य धन्य ते नर श्रेष्ठी। क्रोध आलिया पोटीं । ते विवेकदृष्टी निर्दाळिती ॥५४॥ ऐशिये दृष्टीचे जे नर । चैतन्याचे निजमंदिर । परब्रह्माचे भांडार । ब्रह्म साकार ते पुरुष ॥ २८ ॥ भूती पाहतां भगवद्भाव । कामक्रोधासी कैंचा ठाव । ऐसा ज्याचा निज सद्भाव । तोचि स्वयमेव परब्रह्म ॥२९॥ क्रोध आलिया तत्वतां । अणुमात्र न करीच स्वार्था । करविले कोटी कोटी अनर्था । जघन्यता जगनिंद्य ॥३०॥ भलत्याही क्रोधानुकारी । कोपे अल्प -अन्यायमात्रीं । कोपू परम अपकारी । कोणी यावरी कोपेना ॥३१॥ उन्मत्त गज जेवीं मारी । त्यासी सिंह पाडी धेखरी । परी कोपावरी कोपकरी । ऐसा संसारी कावीर नाहीं ॥ ३२ ॥ क्रोध एकला एक । चहूं पुरुषार्थी घातक । ऐक त्याचाही विवेक । दुष्ट परिपाक क्रोधाचा ॥ ३३ ॥ क्रोध येतांचि मानसीं । स्वधर्म कर्मा क्रोध त्रासी । क्रोध अर्थ स्वाथै विध्वंसी । मोक्ष क्रोधापासीं कदा न घडे ॥३४॥ क्रोध आलिया एकांती । स्त्रीपुरुषां कलहो उत्पत्ति । धक्काबुक्कीमध्ये रात्री । काम विघाती मूळ क्रोधू॥३५॥क्रोध आलिया धर्मसंधीं । मुख्य ब्राह्मणांतें स्वयें निंदी । परापवादाच्या अनुवादी । क्रोधे धर्मसिद्धि कदा न घडे ॥ ३६ ॥ क्रोध धर्माते उच्छेदी । क्रोध धर्मातें निंदी । क्रोध पापी हा दुद्धि । निंदानुवादी जल्पोनी ॥ ३७ ॥ क्रोध पित्यातें निर्भर्सी । क्रोध मातेते म्हणे दासी । क्रोध स्वधर्मातें नासी । क्रोधापासीं अधर्म ॥ ३८ ॥ बंधुबंधु आत आप्त । अर्थ स्वार्थे क्रोधाभिभूत । स्वबंधूसी हाणवी लाथ । अति अनथू तो क्रोधू ॥३९॥ उत्तम अर्थाची प्राप्ती । क्रोध मुख्य विश्वासघाती। अर्थापासोनि क्रोध अनर्थी। जाण निश्चिती लंकेशा ॥ ४० ॥ -भावार्थरामायण.