पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८२) होळी । क्रोध तापसातें छळी । क्रोध महाबळी अनर्थ ॥ ५ ॥ क्रोध सहाकारी कामासी । क्रोध आलिया काम नासी । क्रोध विवेकातें ग्रासी । तो तुजपाशी अतिक्रोध ॥ ६ ॥ क्रोध केवळ महा मांग । जिवे मारिलें वैराग्य । सकळ योगां होय भंग । क्रोध सर्वांग अति अपवित्र ॥ ७ ॥ मातंग विटाळ जळे निवृत्ति । क्रोधाची चित्तामाजी वस्ती । त्याचे क्षालणी न चले युक्ती । क्रोध सर्वार्थी घातक ॥ ८॥ कामासी जे वश्य होती । कांहीं तरी भोग भोगिती । जे आतुडले क्रोधा हातीं । ते वृथा नागवती भोगमोक्षां ॥९॥ क्रोधा ऐसा वैरी । बैसला असतां जिव्हारी । जो तयाची मानी थोरी । ते चराचरी अति मूर्ख ॥ १० ॥ अपकारियावरी कोप करिती । कोणी कोपावरी कोप न करिती । क्रोध वाटपाडा निश्चिती । चहूं पुरुषार्थी नागवी ॥ ११॥ अल्प अन्याय देखिल्यावरी । त्यावरी जो तो कोप करी । क्रोधा एवढा अपकारी । क्रोध क्रोधावरी न करिती ॥ १२ ॥ क्रोध अपराधाची थोरी । अतयं रिघोनी जिव्हारीं । चहूं पुरुषार्थांची करी बोहरी । नानापरी विभांडी ॥ १३॥ क्रोध आलिया कडकडाटी। काम पळे उठाउठी । धर्म जाय बारा वाटीं । क्रोधे तुटी अर्थस्वार्थी ॥ १४ ॥ क्रोध कामाचा कैवारी । क्रोध अभिमानाचा सहाकारी । क्रोध लोभा सबाह्यांतरी । पापकारी निज क्रोध ॥ १५ ॥ क्रोध संचरल्या देहीं । अणुमात्र हित नाहीं । पापाच्या कोटी पाहीं । क्रोधाच्या पायीं तोडरी ॥ १६ ॥ कोप आलिया दुर्धर । जयाचा लोपेना विचार । तोचि मोक्षाचा अधिकार । परम धीर तो एक ॥ १७ ॥ कोपामाजी सावधान । अवतारपुरुषाचे हे चिन्ह । तें चालतें ब्रह्मज्ञान । जग पावन त्याचेनि ॥१८॥ आंगा येतां क्रोधसंग।अपवित्र होय सर्वांग । ब्रह्मचर्या होय भंग । तपा संहार होय क्रोधे ॥ १९ ॥ यज्ञ दान दक्षणा । कोप येतांचि पैं जाणा । सर्व क्रियाकर्म व्यर्थ जाणा । करी उगाणा तपाचा ॥ २० ॥ छिद्र पडतां घट गळे । क्रोधानळे तप जळे । योगी संन्यामी पडती मेळे । क्रोधे निजबळें बांधिलें पै॥२१॥ बाह्य मांगाचा विटाळू । जकमार्जने फिटे मळू । क्रोध अतिशय चांडाळ । नव्हे निर्मक प्रयागी ॥२२॥ करितां काशीवास स्नान । तंव क्रोध खवळे गहन । क्रोधा ऐसा पापी पूर्ण । नाही