पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आशेने ॥ ४२ ॥ एक नम दिगंबर अवधूत । होउनी फिरती अरण्यांत । परी आशापाशें नाडिले त्यांतें। जनासि हात पसरिती ॥४३॥ एकी घेतलें संन्यासग्रहण । परी जिव्हसी नावडे कदन्न । त्याची आशा धरितां जाण । नारायण अंतरला ॥ ४४ ॥ एक करिती तपाचरण । वरते हात धूम्रपान । हात पसरिती जनाकारणें । तेही आशेने नाडिले ॥ ४५ ॥ ऐशी आशा महा वैरीण । मुमुक्षु साधक ठकविले येण । श्रीहरिकृया करील जाण । तरीच मन स्वस्थ राहे ॥४६॥ सेवितां प्राण्यास वाटतें सुख । परी परिणामी होय दुःख । विषय सेवितां थकले लोक । अती नरक प्राप्त तयांसी ॥४७॥ शब्दविषय मृगांकारणें । परम आवडे जी वाहून । नादी लुब्ध होतांचि जाण । पारधी विधानि मारिती ॥४८॥ स्पर्शविषय तो स्त्रीसंग । तेणेंचि नाडिले अवघे मातंग । रूप विषयीं लाधला पतंग । जच्चलें अंग तयाचें ॥ ४९ ॥ रसविषय मत्स्याकारणें । आमिष गिळितां सुखावे मन । गळ आसुडितां हिंसकानें । अचुक मरण चुकेना ॥ ५० ॥ गंधविषय भ्रमर सेविती । कमळमकरंदी लुब्ध होती । अस्तमानासी जातां गभस्ती । गुंतती .त्यामाजी ॥ ५१ ॥ एक एक आवड एकाचे ठायीं । त्यांची गती ऐशीच पाहीं । 1 आणि पंचविषय नरदेहीं। परिणाम नाहीं उत्तम ॥ ५२ ॥ परी रसनाविषय अवघ्यांत दुष्ट । याचेनि इंद्रिये होतात पुष्ट । यालागि जे कां सज्ञान श्रेणी रसना स्पष्ट जिंकावी ॥ ५३ ॥ वासनाक्षय नव्हेचि ज्यासी । गोड अन्न पाहिजे खावयासी । यास्तव जाहले संन्यासी । वृथा गुरूसी नाडिलें ॥ ५४ ॥ मरणसमयीं इंद्रियें क्षीण । तिळमात्र न खाववे अन्न । परी वासना म्हणे मी पदार्थ सेवीन । तरी जन्म घेणे चुकचिना ॥ ५५॥ सहज समयीं मिळेल जैसें । क्षुधाहरणार्थ सेविजे तैसें । तरीच निर्विघ्न मुमुक्षुस । वासनानाश सहजचि ॥ ५६ ॥ IE P ATणाला लागा कशासतविजय. 1ORI