पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असच्छिष्य ॥८॥वाटे विषयांचे सुख। परमार्थ संपादणे लौकिक । देखोंदेखीं पढतमूर्ख। शरण गेले ॥९॥झाली विषयी वृत्ति अनावर । दृढ धरिला संसार । परमार्थचर्चेचा विचार । मलिन झाला ॥१०॥ मोड घेतला परमार्थाचा । हव्यास धरिला प्रपंचाचा । भारवाही कुटुंबाचा । काबाडी झाला ॥११॥ मानिला प्रपंची आनंद। केला परमार्थी विनोद। आंत मूढ मतिमंद । लाधला कामीं ॥१२॥ सूकर पूजिले विलेपनें । म्हैसा मर्दिला चंदने । तैसा विषयीं ब्रह्मज्ञाने। विवेकें बोधिला ॥१३॥रासभ उकरडां लोळे। तयास परिमळ सोहळे । उलूक अंधारी पळे । तया केवी हंसपंगती ॥१४॥ तैसा विषयदरींचा व-हाडी । घाली अधःपतनी उडी । तयास भगवन्ती आवडी । सत्संग कैंचा ? ॥१५॥ वर्ती करून दांताळी । श्वानपुत्र हाडें चघळी । तैसा विषयी तळमळी । विषयसुखाकारणें ॥ १६॥ तया श्वानमुखी परमान्न । मर्कटासि सिंहासन। तैसे विषयसक्तास ज्ञान । जिरेल कैचें ? ॥१७॥रासमें राखतां जन्म गेला । तो पंडितांमध्ये प्रतिष्ठला । न वचे तैसें अभक्ताला । परमार्थ नाहीं ॥१८॥ मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा । लक्षनियां विष्टेचा गोळा । हंस म्हणवी ॥१९॥ तैसे सज्जनाचे संगतीं । विषयी सज्जन म्हणविती । विषय अभेद चित्तीं । गोळा लक्षिला ॥२०॥कांखे घेऊनियां दारा। म्हणे मज संन्यासी करा । तैसा विषयी सैरावैरा । ज्ञान बडबड़ी ॥ २१ ॥ असो ऐसे पढतमूर्ख । ते काय जाणती अद्वैत सुख ?। नरकी प्राणी नरक। भोगिती स्वइच्छे ॥२२॥वेश्येची करील सेवा । तो कैसा मंत्री म्हणावा । तैसा विषयी दास मानावा । भक्तराज केवीं? ॥२३॥ तैसे विषयी बापुडे । तयांस ज्ञान कोणीकडे ? । वाचाळ, शाब्दिक, बडबडे, । वरपडे जाहले ॥ २४ ॥ ऐसे शिष्य परम नष्ट । कनिष्ठांमध्ये कनिष्ठ । हीन, अविवेकी, दुष्ट । खळ, खोटे, दुर्जन ॥ २५ ॥ -दासबोध. नाज २८ षड्रिपू. . शासनका श्लोक.in Sir तृष्णेते निवटी, क्षमेस जवटीं, गर्वादिकांतें पिटीं । कालिजाक गोको सत्यातें उमटी हृदंबुजपुटी, सेवी दया गोमटी, न ई