पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनः- सवाई.रि शिष्य बहू गुरु मेळविती, परि दुर्लभ तो जगिं शिष्य करी,। मा ब्रह्मचि होउनि शेष उरे, तरि ते खुण शिष्यपणाचि खरी;" मंत्रहि देतिल जे शिकवीतिल नाटक, काव्य, कळा कुसरी; तेहि गुरू परि सद्गुरुवांचुनि शिष्यपणाचि असे न उरी. ॥ २५ ॥ रामदासः आव्या. Ts ite मुख्य सच्छिष्याचे लक्षण । सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण । अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ २६ ॥ शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारशीळ । शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥ २७ ॥ शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे शुचिष्मंत । शिष्य पाहिजे नेमस्त । सर्व प्रकारी ॥ २८ ॥ शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष । शिष्य पाहिजे अलक्ष्य । लक्षी ऐसा ॥ २९ ॥ शिष्य पाहिजे आतिधीर । शिष्य पाहिजे आत उदार । शिष्य पाहिजे अति तत्पर । परमार्थविषयीं ॥३०॥ शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी । शिष्य पाहिजे अर्थोतरी। प्रवेशकर्ता ॥३१॥ शिष्य पाहिजे परमशुद्ध। शिष्य पाहिजे परम सावध । शिष्य पाहिजे अगाध । उत्तम गुणांचा ॥ ३२॥ शिष्य पाहिजे प्रज्ञावंत । शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त । शिष्य पाहिजे नीतिवंत । मर्यादेचा ॥३३॥ शिष्य पाहिजे युक्तिवंत । शिष्य पाहिजे बुद्धिवंत । शिष्य पाहिजे सतत । विचार घेता ॥३४॥शिष्य पाहिजे धारिष्टाचा । शिष्य पाहिजे दृढ प्रतापाचा । शिष्य पाहिजे उत्तम कुळींचा । पुण्य. शीळ ॥ ३५ ॥ शिष्य असावा साविक । शिष्य असावा भजक । शिष्य असावा साधक। साधनकर्ता ॥ ३६ ॥ शिष्य असावा विश्वासी। शिष्य असावा कायाक्लेशी। शिष्य असावा परमार्थासी । वाढवू जाणे ॥३७ ॥ शिष्य असावा स्वतंत्र। शिष्य असावा जगन्मित्र । शिष्य असावा सत्पात्र । सर्व गुणें ॥ ३८ ॥ शिष्य असावा सद्विद्येचा। शिष्य असावा सद्भावाचा। शिष्य असावा अंतरींचा । परम शुद्ध ॥३९॥ 4 शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी। शिष्य असावा संसार.