पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुरुसेवा करितां नुपजे लाज । हेंचि लक्षण शिष्याचें ॥८॥ गुरुतीर्थ करी प्राशन । सदा गुरुगौरवगायन । हरिगुरुरूप देखे समान । हेचि लक्षण शिष्याचें ॥ ९ ॥ माझें शरीर असो बहुकाळ । मज गुरुसेवा घडो निर्मळ । गुरुभेटीलागी उतावेळ । हेचि लक्षण शिष्याचें ॥१०॥ गुरुनिंदा ऐकतां जाण । बोटे घालुनि बुजी कान । पुन्हा न पाहे त्याचे वदन । हेंचि लक्षण शिष्याचें ॥११॥ अद्भुत प्रज्ञा जवळी असे। चातुर्यकळा हृदयीं वसे । अंगीं सद्भाव विशेष दिसे। हेंचि लक्षण शिष्याचे॥१२॥ सवेखेसी आति उदार । गुरुकायोसी सदा सादर । लोकिकावरी नाही भार । हेचि लक्षण शिष्याचें ॥ १३ ॥ जे देशी वसे गुरुनाथ । तिकडूनि जरी आला मारुत् । त्यासी क्षेम द्यावया धावत । हेचि लक्षण शिष्याचें ॥ १४ ॥ नानामतें कुमार्ग अनाचारी । येथे न बैसे क्षणभरी । वेदाज्ञा वंदी जो शिरीं । हेचि लक्षण शिष्याचें ॥ १५॥ हरिविजय. शुमानंद: ओव्या. सद्गुरु पिता सद्गुरु माता । सद्गुरूवाक्य शास्त्र तत्वतां । सद्गुरुसेवेवीण सर्वथा । आन साधन नेणिजे ॥ १६ ॥ सद्गुरूसी इच्छा चित्तीं । तो ती पूर्ण करी सर्वशक्ति । गुरुभजनीं प्रेमरती । देहाभिमान पैं नेणे ॥ १७ ॥ स्वधर्म तो सद्गुरुध्यान । नाम सद्गुरूचे मुखीं पावन । सद्गुरुसेवा तें जीवन । नित्य पूजन गुरुपद ॥ १८ ॥ सद्गुरु भावी चंद्रमा । आपण होय चकोरसमा । सद्गुरु मेघाची उपमा । आपण होय चातक ॥ १९ ॥ सद्गुरु तो भास्कर एक । आपण सदा चक्रवाक । सद्गुरु चित्सूर्य देख । आपण कमळ विकासे ॥ २०॥ सद्गरु चंद्र षोडशकळा । आपण चंद्रकांत शिळा । दर्शनें स्मरणें झळझळां । पाणी होउनियां राहे ॥ २१ ॥ सद्गुरु तो जळधर । आपण नाचे मयूर । सद्गुरु मृगनाभी साकार । अंबररूपे आपण ॥ २२ ॥ सद्गुरु तो चुंबकशिळा । आपण झाला लोहखिळा । सद्गुरु शिष्य तो निश्चळा । भरे रत्नाकर सिंधुहोनी ॥ २३ ॥ सद्गुरुकृपामृतजळीं । आपण तरंग सुखकल्लोळी । सद्गुरूसी अर्पिल्यावेगळी । सेवीना ॥२४॥ किया उद्योगपर्व.