पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

।हेत । प्रेमभरें सदा डुलत । त्यासी शरण आधी जावें ॥ ६ ॥ ज्यासी हरि11 कीर्तनी आवडी । संतदर्शना घाली उडी । तीर्थक्षेत्रमहिमा न खंडी । त्यासी शरण आधी जावें ॥६१॥ FEER ज्यासी गुरुसेवा नावडे यथार्थ । काय जाळावा त्याचा परमार्थ । गुरुसेवेवीण विद्या समस्त । अविद्या होती जाणपां ॥ ६२ ॥ जो कंटाळे गुरुसेवेसी । किडे । पडले त्याच्या ज्ञानासी । जो स्वामीस आपुल्या द्वेषी । तो महानरकी जाईल । ॥ ६३ ॥ सद्गुरूचे स्मरण न करी । नाठवी गुरुमूर्ति अंतरीं । तो बुडाला अघोरी । चंद्रार्कवरी दुरात्मा ॥ ६४ ॥ सद्गुरूचे नाम सांगतां । लाज येत. ज्याचिया चित्ता । त्या चांडाळाचें मुख देखतां । सचैल स्नान करावें ॥६५॥ गुरुचरणीं मन न ठेवितां । व्यर्थ काय चाटावी कविता । तो ज्ञान सांगे ते तत्वतां । मद्यपियाचे भाषण ॥ ६६ ॥ -हरिविजय. 117२६ मशिष्य ओव्या . जे तनमनधनेसी शरण । गुरुवचन ज्यांसी प्रमाण । न पाहती गुरूचे दोषगुण । हेचि लक्षण शिष्याचें ॥१॥ गुरु सांगती ते आचरती । गुरुसमान आपण न म्हणती। दिवसेंदिवस चढे भक्ति । हेचि लक्षण शिष्याचें ॥ २॥ गुरु हा केवळ ईश्वर । मजलागीं धरिला अवतार । ऐसा मनी दृढ निर्धार । हेचि लक्षण शिष्याचें ॥३॥ मी एक जाणता सर्वज्ञ । गुरुसन्निध न मिस्वी. योग्यतापण । घडोघडी आठवी गुरुचरण । हेचि लक्षण शिष्याचें ॥ ४॥ सकळ देवांहनि आगळें । गुरुस्वरूप जेणं निर्धारिलें । मन गुरुपदींच लंपट झालें । हेंचि लक्षण शिष्याचें ॥ ५ ॥ सारासारविचार । गुरुमुखें ऐकती निरंतर । आवडे अद्वैत शास्त्र की हरिचरित्र । हेंचि लक्षण शिष्याचें ॥ ६ ॥ गुरु सांगे जे विहित गोष्टी । ते सदा धरी हृदयसंपुटीं । प्रवृत्तिशास्त्रावरी. नाही. दृष्टी । हेंचि लक्षण . शिष्याचें ॥७॥ गुरुनामस्मरणाचा ध्वज । अखंड उभा राहिला तेजःपुंज । कलम १२६ सुशिष्य. श्रीधर: