पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जो सर्वज्ञ परिपूर्ण । ज्यासी नाही ज्ञानाभिमान । जो वेदाज्ञा मानी प्रमाण । 11. त्यासी शरण आधी जावें ॥ ४४ ॥ जो सर्वज्ञ दयाळ उदास। जो सदाचार वृत्ति जैसा चंडांश । सर्वांभूती दया विशेष । त्यासी शरण आधी जावें ॥ ४५ ॥ जो तरोनि दुसरियासी तारिता होये । शिष्य जो ब्रह्मरूप पाहे । मान। अपमानी चित्त सम राहे । त्यासी शरण आधी जावें ॥ ४६॥ आपण ज्यास विद्यादान केलें । ते शिष्य दुजिया शरण गेले। चित्त क्रोधे न खवळे । त्यासी शरण आधी जावें ॥ ४७ ॥ जन झुगारिती निंदेचे पाषाण । पुढे केलें क्षमा वोडवण । मनांत नुपजे द्वेष पूर्ण । त्यासी शरण आधी जावें ॥४८॥ पुत्राहनि विशेष गाढें । शिष्यावरी प्रेम चढे । जो शिष्या न घाली सांकडें । त्यासी शरण आधी जावे ॥ ४९ ॥ वर्ते आपुल्या वर्णाश्रममेळीं । न चाले कदा वाकुडे पावुली । सदा आत्मरूपी वृत्ति रंगली । त्यासी शरण आधी जावें ॥ ५० ॥ पिंडब्रह्मांड नाशिवंत । आत्मरूप एक शाश्वत । हे जाणूनि सदा विरक्त । त्यासी शरण आधी जावें ॥ ५१ ॥ शरीरप्रारब्ध भाग्य आलें । अथवा एकदाचि सर्व बुडालें । परि हर्षामर्षपंकें मन न मळे । त्यासी शरण आधी जावें ॥ ५२ ॥ पिपीलिका आणि कमलासन । इंद्र आणि दरिद्री दीन । राजा रंक अवघे समान । त्यासी शरण आधी जावें ॥ ५३ ॥ वैकुंठापासूनि नागपर्यंत । भूताकृति ज्या ज्या दिसत । त्या त्या हरिरूप भासत । त्यासी शरण आधी जावें ॥ ५४ ॥ जैशा नाना घागरी आणि एक रांजण । त्यांत भासे एक चंडकिरण । तैसें ज्यास न दिसे स्त्रीपुरुषभान । त्यासी शरण आधी जावें ॥ ५५ ॥ जो बोले चाले जनी हिंडे । परी ज्याची समाधि न मोडे । वाद प्रतिवाद नावडे । त्यासी शरण आधी जावे ॥५६॥ पृथ्वीचे राजे भाग्यवंत । नित्य ज्याच्या दर्शना येत । परी मी थोर हा नुपजे हेत । त्यासी शरण आधी जावें ॥ ५७ ॥ भाग्यवंताचें करावें स्तवन । दीनदुर्बळांचें हेळण । हे ज्यापासीं नाहीं लक्षण । त्यासी शरण आधी जावें ॥ ५८ ॥ प्रपंच जाहला किंवा नाहीं । हे स्मरण नसे कांहीं । जो बुडाला ब्रह्मानंदडोही । त्यासी शरण आधी जावें ।। ५९ ॥ इतुकिया लक्षणीं अलंकृत । ज्यासी गुरुभजनीं नित्य