पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नूची दुभणी । निष्कामास न लगती ॥ २६ ॥ सद्गुरूस म्हणों लक्ष्मीवंत । तरी ती लक्ष्मी नाशवंत । ज्याचे द्वारी असे तिष्ठत । मोक्षलक्ष्मी. ॥ २७ ॥ स्वर्गलोक इंद्रसंपत्ती । हे काळांतरें विटंबती । सद्गुरूकृपेची प्राप्ती । काळांतरी चळेना. ॥ २८ ॥ तयास उपमा काय द्यावी ? | नाशवंत सृष्टी आघवी । मा. पंचभौक्तिक उठाठेवी । न चले तेथें. ॥ २९ ॥ म्हणोनि सद्गुरू वर्णवेना । म हेंग हेचि माझी वर्णना । अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती. ॥३०॥ नारNE दासबोध. श्रीधरः- आव्या शा . आत्मप्राप्तीस कारण । धरावे श्रीगुरूचे चरण । गुरुकृपेवीण ज्ञान । कल्पांतीही साधेना ॥३१॥ पदार्थ न दिसे नेत्रेवीण । मोड न वाढे जीवनावीण । परिसावीण सुवर्ण । लोहाचें नोहे सर्वथा ॥ ३२ ॥ जो गुरुसेवेसी सादर । आत्मज्ञाने जोडूनि कर । उभा त्यापुढे निरंतर । अहोरात्र तिष्ठतसे ॥३३॥ गुरुसेवा जयासी नावडे । त्याचे ज्ञानासी पडले किडे । जन्ममरणांचें सांकडें । न सरे त्याचे कल्पांती ॥ ३४ ॥ जयासी नावडे गुरुसेवन । तो झाला चतुःषष्ठिकळाप्रवीण । साही शास्त्र मुखोद्गत पूर्ण । परी तें भाषण मद्यपियाचें ॥ ३५॥ तेणें केलें जरी कीर्तन । दावी वरपांग डोलून । परी गुरुदास्य नावडे पूर्ण । त्यास बंधन चुकेना ॥ ३६ ॥ जळो त्याचा प्रताप । काय चाटावे कोरडें तप । जैसें विगतधवेचे स्वरूप । यौवन काय जाळावें ॥ ३७ ॥ गभाधाचे विशाळ नेत्र । अदातयाचें उंच मंदीर । की धनलुब्धाचा तत्वविचार । की रम्य गृह अंत्यजाचें॥३८॥ भ्रष्टासि काय कुळगोत्र । श्वान नेणे पवित्रापवित्र । जैसें मद्यपियाचे पात्र । श्रोत्रिय म शिवे सर्वथा ॥ ३९ ॥ तैसे गुरुकृपेवीण जे नर । ते देहासी आले जैसे खर । सदा विषयव्यापारी सादर । आपपर नसे जयां ॥ ४० ॥ तनुधनमनेंसी शरण । श्रीगुरूसी जो न भजे आपण । तो झाला जरी शास्त्रप्रवीण । न करितां गुरुभजन तरेना ॥ ४१ ॥ व्यर्थ गेलें तयाचें तप । जळो जळो तयाचा जप । व्यर्थ काय कोरडा प्रताप । गुरुवचन नावडे जया ॥ ४२ ॥ सद्गुरूचे घरी आपदा । आपण भोगी सर्व संपदा । त्या अपवित्राचे मुख कदा । दृष्टी न पहावें कल्पांती ॥४३॥ -रामविजय.