पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासः- ओव्या.Megate जयजयाजी! सद्गुरुराजा! । विश्वंभरा ! विश्वबीजा ! । परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधू ॥ ९ ॥ तुझियेनि अमयकरें । अनावर हे माया ओसरे । जैसें सूर्यप्रकाशे आंघारें । पळोनि जाय. ॥ १० ॥ आदित्ये अंधकार निवारे । परी मागुते ब्रह्मांड भरे । निशी झालियानंतरें। पुनः काळोखें ॥ ११॥ तैसें नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्यूचा वाव । समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी.॥१२॥ सुवर्णाचें लोह कांहीं । सर्वथा होणार नाही । तैसा गुरुदास संदेही । पडोचि नेणे सर्वथा. ॥१३॥ का सरिता गंगेसि मिळाली । मिळणी होतां गंगाचि झाली । मग जरी वेगळी केली । तरी होणार नाही सर्वथा ॥ १४ ॥ परि ती सरिता मिळणीमागें । वोहोळ मानिजे ती जगें । तैसा नोहे शिष्य वेगें। स्वामीचि होय. ॥ १५ ॥ परीस आपणा ऐसें करीना । सुवर्णे लोह पालटेना । उपदेश करीत बहुजना । अंकित सद्गुरूचा. ॥ १६ ॥ उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंताचे क्षार । अथवा म्हणो क्षीरसागर । तरी नासेल कल्पान्तीं ॥ १७ ॥ उपमे द्यावा जरी मेरू । तरी तो जडपाषाण कठोरू । तैसा नव्हे की सद्गुरू । परम कोमळ दीनाचा. ॥ १८॥ उपमेस द्यावें गगन । परी गगनापरीस तो निर्गुण । याकारणे दृष्टांत हीन । सद्गुरूसि गगनाचा. ॥ १९॥ धीरपणे उपमूं जगता । तरी हेही खचेल कल्पांती । म्हणोनि धीरवास दृष्टांतीं। हीन वसुंधरा. ॥ २० ॥ आतां उपमेस द्यावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती? । शास्त्रे मर्यादा बोलती । सद्गुरू तो अमर्याद ॥ २१ ॥ म्हणोनि उपमेस उणा दिनकर । सद्गुरू ज्ञानप्रकाश थोर । आतां उपमावा फणिवर । तरी तो भारवाही. ॥ २२ ॥ आतां उपमेस द्यावें जळ । तरी ते. कालांतरें आटेल सकळ । सद्गुरुरूप तें निश्चळ । जाणार नाही. ॥ २३ ॥ सद्गुरूस उपमा अमृत । तरी अमर धरिती मृत्युपंथ । सद्गुरूकृपा यथार्थ । अमरचि करी ॥ २४ ॥ सद्गरूस म्हणावें कल्पतरू । तरी हा कल्पनातीत विचारू । कल्पवृक्षाचा अंगीकारू। कोण करी? ॥ २५ ॥ चिंतामात्र नसे मनी । कोण पुसे चिंतामणी। कामधे