पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संरक्षिता भापण । निजगणा विघ्न शिवों नेदी ॥ ४ ॥ सद्गुरूसी न रिघता शरण । सदा न सुटे देहबंधन । तया चरा अधःपतन । शापिया पूर्ण तो सृष्टी ॥ ५ ॥ किनार Rep लाकाजाTEREMIER -माशरामायण, चामनः- ओल्या . आता असोनीही अनुभव । ज्यास नाहीं शास्त्रवैभव । ते चुकविती आपला पुनर्भव । परि उद्धरूं न शस्ती मुमुक्षूते ॥६॥ शिष्यसंदेह न शके हरूं । तो अनुभवीही न म्हणवे गुरू । कल्पिले पदार्थ नेदी तरू। तो कल्पतरू कैसा म्हणावा ? ॥ ७ ॥ म्हणोनी शास्त्रज्ञ आणि अनुभवी । साजे त्याला गुरुत्वपदवी । तोचिजगद्गुरु गोसावी । की शास्त्रज्ञ आणि अनुभवी परिपक्व ॥८॥ तैसाच शास्त्राविण। जरी अनुभवी झाल्या ब्राह्मण । न साजे त्याला गुरुपण । की शिष्यसंदेह न हरी ॥९॥ त्यांतही गुरुसेवातत्पर । गुरूच साक्षात् सर्वेश्वर । ऐसें मानूनि जे सादर। सेविती श्रीगुरूतें ॥१०॥ त्यास सच्छास्त्रपठण । नसोनिही होय सर्व शास्त्रज्ञान । श्रीगुरुचें मन । प्रसन्न झाले त्यावरी ॥११॥ श्रीगुरूच्या कळा । यत्न न करितां पावे सकळा । अंजन घालितां डोळां । पदोपदी निधाने॥१२॥किंबहुना एकलव्य या नांवें । जातीचा कोळीही भक्तिभावें । गुरुप्रतिमापूजाप्रभावें । रहस्यविद्या गुरूची पावला ॥१३॥हे आदिपर्वी भारती कथा । विस्तारितां वृद्धि होणारग्रंथा। एवं गुरुशुश्रूषा सर्वथा । गुरुसामर्थ्य संपादी शिष्यातें ॥१४॥ परंतु गुरु असावा भला । तरीच भलेपण प्राप्त होय शिष्याला । बौद्ध गुरु सद्भावें सेविला । तरी प्रौढ बौद्धच होणार ॥१५॥ ज्याची धरावी संगती । तो जाईल ज्या गावाप्रती । त्याचे आश्रित हो पावती । त्याच गांवासी ॥१६॥ वेदविरुद्ध अनुष्ठान । तेंचि नरकाचे साधन । त्या गुरुसंगतीने शिष्यजन । जाती तया नरकासी ॥१७॥ एवं गुरु असेल जैसा । शिष्यही होईल तैसा । गुरुविश्वास तरि तो ऐसा । समजोनि गुरु करावा बावा. हो! ॥१८॥ याकारणें गुरू । अनुभवसुखाचा कल्पतरू । वेदजंबुद्वीपाचा मेरू । तोचि सेवावा ॥१९॥ त्यांत कोणांस अनुभव मात्र । कोणांस अनुभव हो शास्त्र । गुरु