पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४९) शुभानंद: ओव्या. एक ग्रासी आवश्यक । आपुलाचि जाणे स्वार्थ एक । एक भोजनी मानी सुख । तोचि मूर्ख पापात्मा ॥ ८ ॥ सर्वकाळ श्रद्धारहित । नेणे धर्मनिरोपणपंथ । कथाश्रवणीं नाहीं चित्त । तोचि मूर्ख दुरात्मा ॥९ ॥ खधर्म आपला सांडोन । होवोनि वर्ते विषयाधीन । परस्त्री परधनी घाली मन । तोचि मूर्ख दुरात्मा ॥१०॥ जेथ अविद्या कल्पना । आवडी नसे ईश्वरभजना । नायके श्रेष्ठांच्या वचना । तोचि मूर्ख दुरात्मा ॥ ११॥ सदा प्रवृत्ति कल्पी चित्तीं। विषय सेवितां अतृप्ती। चित्तीं वसे विषयभक्ति । तोचि मूखे दुरात्मा ॥ १२ ॥ स्पर्धा करी बळिष्ठातें। बळ न तुळे आपुल्या चित्तें । अकारण उदित होय मरणातें । तोचि मूर्ख दुरात्मा ॥ १३ ॥ परस्त्री परहित अपहार । करावया कुशळत्व फार । ईश्वरभजनीं अनादर । तोचि मूर्ख दुरात्मा ॥ १४ ॥ मानी संसार शाश्वत । त्या त्या ऐसे करी विषयवार्थ । न स्मरे नेणे काळ, अपघात । तोच मूर्ख दुरात्मा ॥ १५ ॥ साधुगुरूची निंदा करी । देवब्राह्मणद्वेष करी । मिथ्याभिमान वाहे शरीरी । तोचि कुपुत्र दुरात्मा ॥ १६ ॥ सांडोनि अनादि कुळाचार । आचरे परधर्म अनाचार । परनिंदानुवादें जागे वक्र । तोचि मूर्ख दुरात्मा ॥ १७ ॥ सायासें एक मिळवीतसे । लाधलें तें सर्वां सरिसें । तेथ देहलोभ करी विशेषे । तोचि मूर्ख दुरात्मा ॥ १८ ॥ भक्ष्य भक्षित पंथी चाले । हांसत हांसत मुखें बोले । दोघे बोलतां ऐकों चाले । तो शतमूर्ख दुरात्मा ॥ १९ ॥ श्रेष्टी वर्जितां करी दुष्कृती । कर्म प्रतिष्ठी अनाहुती । जपतपकर्मी अश्रद्धा हितीं । तोचि मूर्ख दुरात्मा ॥ २० ॥ आपण प्रतिष्ठित म्हणोन । करी अन्याय आचरण । धर्मनीति करी खंडण । तोचि पाषाण दुरात्मा ॥ २१ ॥ आपणामाजी दैवेंकरून । येकदा झाला संपन्न । त्यावरी अनहित कल्पी मन । तोचि पाषाण पापात्मा ॥ २२॥ येवोनियां नरशरीरी । आपुली आपण वोळखी न करी । विषयी लोळे श्वानापरी। तो निर्धारी दुरात्मा ॥ २३ ॥ सदा कुपथ्यभोजन । निंदी देव साधु ब्राह्मण । ऐसेया पापात्मया अकाळमरण । लिहिलेसे विधीनें ॥२४॥ एक वर्ततां अनाचारें। जरी आपणा ठावें होउनि सरे ।तों उघड करी परस्परें। तोचि मूर्ख दुरात्मा ॥२५॥ -उद्योगपर्व. - M