पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४८) बोलविल्या बोलणें । प्रभू पुसेल ते सांगणे । न पाचारितां न जाणे । तोचि पाव प्रतिष्ठा ॥ १३ ॥ राजासनी राजवहनीं । राजाचिया एकांत सदनीं । बेसका न करी तो षड्गुणी । मान पावे नृपाचा ॥ १४ ॥ आपुलें प्रकटू नेदी ज्ञान । नेणत्यातें न म्हणे जो अज्ञान |ज्याचिये मुखीं मधुरवचन । तोचि मान्य विश्वात॥१५॥ -विराटपर्व. श्रीधर-3 ऑव्या. बोलणे कोमल विनयता । स्नेहकरून केली आप्तता । सत्यप्रिय भाषणनम्रता। त्या वश्य सर्व प्राणी ॥१६॥ सहनशीळ आणि सत्य । तेणें विश्व जिंकिलें समस्त । एवं सर्व गुण पांडव भरित । म्हणूनि वंद्य विश्वातें ॥१७॥ सर्वांभूती दया समानः । देवही वंदिती त्याचे चरण । वृत्ति जाहली निरभिमान । तरी तो मान्य हरिहरा॥१८॥ -पांडवप्रताप. २२ मूर्खपण. मुक्तेश्वरः ओव्या. मी श्रेष्ठ श्रेष्ठाचा कुमर । धरी विद्येचा अहंकार । सुज्ञ सुविद्या न करी नर । तो शतमूर्ख जाणावा ॥ १॥ साखरेतें स्वादिष्ट करणें । कर्पुरातें सुवास देणें । चतुरपुरुषातें शिकविणें । हेचि नेणिव सांगतिया ॥ २ ॥ नलगे अवजेचा पायो। तंवचि आसनी सेविजे रावो । सोसोनि मानहानीचा घावो । लाभ इच्छी तो महामर्ख ॥ ३ ॥ कारणेवीण वाढवी द्वेष । ऐश्वर्य नसतां म्हणवी ईश । पुरुषांमाजी अधम पुरुष । ऐसे ज्ञाते बोलती ॥ ४ ॥ विद्यामदे वाढवी मान । तोचि फळे होवोनि अवमान । निस्तेज म्हणतां हुताशन । प्राणनाश पतंगा ॥ ५ ॥ सिंहासन्मुख मुक्ताफळे । दावितां भंगिती कुंभस्थळें । कस्तूरचिनि परिमळें। हरिण व्याधा हिणावी ॥ ६ ॥ मद्यप्याहाती नागवें खड्ग । झाडितां निवटी आपले आंग । तेविं अहंकार मिरवितां चांग । मूळ होय नाशातें ॥ ७ ॥ FFESगित -आदिपर्व,