पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४७) आली जरी कष्टदशा अपार । न टाकिती धैर्य तथापि थोर ॥ केला जरी पोत बळेचि खालें । ज्वाळा तरी ते वरती उफाळे ॥५०॥ का करी साजे त्याग श्रवणयुगली सच्छ्रवण जें, TIMESवामुखीं सत्य, स्वच्छाचरण विलसे, शौर्यहि भुजे॥ स्वशीर्षे थोराला नमन विभवावांचुनि पहा । भल्याचा की स्वाभाविक शुभ अलंकार विधि हा ॥ ५१ ॥ -नीतिशतक. को २१ राजमान्य.fr मक्तेश्वर:- UPTET ओव्या. नाम रूप थोरपण । कोणा न कळों द्या ज्ञान । दीनाहूनि परमदीन । ऐसें लोकां दाखवावें ॥१॥ दावुनी चातुर्य कुशळते । मूर्खत्व नाणिजे प्रभूतें । श्रेष्ठ बोलिजे न घडे तें । तेचि शब्दी प्रतिष्ठा ॥ २ ॥ असत्य न बोलिजे सर्वथा । धरिजे निर्लोभ निर्मळता । इंद्रियनियमी नित्य वसतां ।तोचि वल्लभ रायातें ॥३॥ राजस्त्रीसंवाद । राजमित्राशी विरोध । राजपुरोहिताशी विनोद ॥ जाणते पुरुषों न करावा ॥४॥ राजा अचाट काम सांगे। न करवे म्हणोनि न येइजे मागें। * स्वभाव ओळखूनि जो वागे ॥ तोचि वल्लभ रायातें ॥५॥ मागां सरे अंत:परी। पुढां ठाके रणचत्वरी। दिली आज्ञा वंदी शिरी । तोचि वल्लभ रायातें ॥६॥ कीजे सर्वांचे आर्जव । कोठे न दाखवी वक्रभाव । सर्वांपासोनि गौरव । तोचि पावे निर्धारें ॥ ७॥ करणी करोनियां लपवी । महिमा दुजियाची वाढवी । महायशाची तो पदवी । आपेंआप पावत ॥ ८॥ रायें नेमलिये व्यापारी। सावधान अहोरात्रीं । आळस निद्रा दवडूनि दुरी । तोचि रायातें आवडे ॥ ९॥ झालिया मानापमान । हर्षविषादी न घाली मन । क्षमाशीळ सुप्रसन्न । तोचि पावे महिमेतें ॥ १० ॥ राजपैशून्य नायके कानीं । राजनिंदा न बोले वदनीं । राजमान्यातें सन्मानी। तोचि मान्य नृपातें ॥११॥ पुसल्याविणे न करी काज । संतुष्टकाली न मनी लाज । राजगौरवें न चढे माज । तोचि पावे महिमेतें ॥१२॥ प्रभने