पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधू मन न परहिताचरणी, घडल्याहि मरण, तळमळवी.। मदकर्दमी न सन्मति तिळभर डावेंहि चरणतळ मळवी. ॥४१॥ वामन: हा श्लोकमा जे वाणी खरी, दान बरें, अहिंसा, । नसे परद्रव्य सती पिपासा। दया, अतृष्णा, नतिभाव जो कां, । सन्मार्ग हा धोपट सर्व लोकां ॥४२॥ विपत्काळी धैर्य, प्रभुपणिं सहिष्णुत्व बरवें। सभे पांडित्याचा प्रसर, समरी शौर्य मिरवे । वकीर्तीच्या ठायी प्रचुररति, विद्या व्यसन जें। तयांचे हे स्वाभाविक गुण सहा, सत्पुरुष जे ॥ ४३ ॥ वानोत, निंदोत, सुनीतिमंत । चलो, असो वा कमला घरांत ॥ हो मृत्य आजीच घडो युगांतीं । सन्मार्ग टाकूनि भले न जाती ॥ ४४ ॥ सुनीतिपथ सेवणे, मलिन कर्म मानेचिना । घडो मरण, नावडे खलजनांप्रति प्रार्थना ॥ विपत्तिसमयीं परि प्रकटवीचना दीनता। भल्याविण असें असिव्रत करूं शके कोणता ? ॥ ४५ ॥ ज्यांची देहमनें, तशीच वचनें पुण्यामृते ओतिलीं । की जेही स्वकृतोपकारविभवें सर्वत्र विस्तारिली ।। लोकांचे परमाणुतुल्य गुण जे मेरूपरी वानिती; । चित्तीं तोषहि पावती, सुजन ते नेणों किती नांदती ॥४६॥ संपत्काळी कोवळी सज्जनाचीं । होती चित्तें जातिपंकेरुहाची ॥ आपत्काळी शैलही आदळों कां, । धाकेना में गाजवी धैर्यडका ॥ ४७ ॥ समान गतः उपकार करी, न बोले । मानी प्रमोद, जरि मान्य घरास आले ॥ दावी न गर्व विभवें गुण घे पराचे । खड्गाग्रतुल्य विषम व्रत हे भल्याचे ४८ तोडिला तरु फुटे अणखी भरानें । तो क्षीणही विधु महोन्नति घे क्रमाने । नागोनि हे, सुजन ज्या दुबळीक आली । त्याशी कदा न करिती सहसा टवाळी ४९