पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्वान । परी तो ध्यानी न आणून । करी गमन यथासुखें ॥ २९ ॥ कीं पंडितांचे सभे आंत । मूर्ख चावटी करी बहुत । तरी नायकोनि त्याची मात । पाहती शास्त्रार्थ निजदृष्टीं ॥ ३० ॥ नातरी अगस्ति मुनी देखोन । पयोब्धि अट्टहास्य करी गर्जन । परी तें कांही ध्यानीं न आणून । करी अनुष्ठान निजनिष्ठं ॥ ३१ ॥ की विनतासुताचिया समोर । क्रोधे फोफावती विखार । 10 परी तयासी भय अणुमात्र । न वाटेचि सर्वथा ॥ ३२ ॥ -भक्तिविजय. मोरोपंतः सुकृतातेंचि स्मरति, न कुकृतातें याचि साधुरीतीची । रुचि रसिका, न सुधेची, की केवळ अल्प. माधुरी तीची. ॥ ३३ ॥ छळकासि कवि न शापिति, देतें जड कनक काय हो! गाळी ? । पाळी जो त्यास मधुर इक्षु, तसा. त्याहि अदय जो माळी ॥ ३४ ॥ सदय हितकाम जो, त्या असमंजस कर्म पाहवेना गा!। कैसे लावू द्या पद, ज्या लंघन न साहवे नागा. ॥ ३५ रवि न ढळेचि, गिळी परि उगळी खळ मळिन मंद राहु टळे ; । गुर्वापदेंहि साधु न भी, न चळे, जेवि अचळ वाहुटळे. ॥ ३६ ॥ सुखदुःखप्राप्तीने कवि हर्षविषाद लेश न धरीती, । वर्षावर्षी जेवीं वृद्धिक्षय सिंधु; हेचि बुधरीती. ॥ ३७ ॥ पंकांत पद्म न मळे ; काकाच्या दुर्गुणा शिवे न पिक; । चंदन परगंध न घे ; होय तृणामाजिं तृणची काय पिक ? ॥ ३८ ॥ विसरति अपकारांतें, उपकारांतचि साधु आठविती ; । बा! सोशितां न सा विति होय वपु, न सोशितां न आठ विती. ॥३९॥ खकरें कापुनि देतां निज मांसहि, उबगला न शिबि कांहीं ; : सुख साधुरीतिंहीं जें दिधलें श्रांतांस, तें न शिबिकांहीं ॥ ४०॥