पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावें पूर्ण । जो आला तयापासी जाण । त्यासी समाधान सारिखचि ॥ १५ ॥ सूर्याचे सामर्थ्य गगनीं । स्वयें नेणे दिनमणी । ते जाणतसे कमळिणी । सुखविकासिनी पैं झाली ॥ १६ ॥ चुंबकाची चाळकशक्ति । स्वतां नेणे निजस्थिति । जडें लोहें सुखेंचि जाणती । ते चळण पावती दर्शनें ॥ १७ ॥ चंद्रकिरणांची अमृतधार । स्वतां नेणे हिमकर । सेवूनि जाणती चकोर । दर्शनें अपार आनंद ॥१८॥ पससी न द्यावें दुःख । परपीडेपरी नाहीं पातक । यालागी साधु सज्ञान लोक । प्राणांती दुःख न देती ॥ १९ ॥ जो प्राणी जन्मा आला । तो गर्भीच जाण मेला । याकारणें साधुमेळा । निःसंग होऊनि रहातसे ॥ २० ॥ नद्या पर्जन्ये भरोनि येती। तेणें सिंधु प्रवाहेना क्षितीं । उष्णकाळी नद्या सुकती । तेणें अपांपती आटेना ॥ २१॥ STS ETRIPाका -भावार्थरामायण. -1TRES नानासरितांचे खळाळ । आणूनि घालिती समळजळ । KOSE तो तिळभरी नव्हे डहुळ । अति निर्मळ निजांगें ॥ २२ ॥E RE मनोरम TREND -भागवत. शुभानंद:-na-nाआव्या. shish साधुपुरुषाचे वर्तन । करितां अंगुष्ठच्छेदन । न बोलती उद्वेगवचन । शांति संपूर्ण या नामें ॥ २३ ॥ सुखदुःख समान दोन्ही । निंदास्तुति मानापमानीं । तितिक्षा ऐसें त्यातें ज्ञानी । साधुजनी बोलिजे ॥ २४ ॥ आपण केले उपकार । दुर्जनें केले कोटि अपकार । न गणी व करी उच्चार । उपरती नर सज्जनी ॥ २५ ॥ राहो ना तरी जावो प्राण । परी जो न ढळे नेमासन । तो नर अध्यात्मसंपन्न । ऐसे ज्ञानी बोलती ॥ २६ ॥ आपणा लाभ परातें हानी । इच्छुनी वर्तती सकळ • श्राणी । सर्वांचे कल्याण मनी मानी । तो एक विरळा धर्मात्मा ॥ २७ ॥ F O -उद्योगपर्व. महीपतिः- या ओव्या. दुराचारी अज्ञानजन । समूळ वेष्टिले अविवेकरूनि । त्याचे करावया उद्धरण । साधुजन हिंडती ॥ २८ ॥ राजबिदीतूनि वारण । चालतां उदंड भुंकती